'शेरखान' स्पर्धा : १

१.
मृगजळाविण राहिला पर्याय नाही
पावसाळा काहिली देऊन गेला

२.
हुंदका साधा तुझा सांगून गेला
भास सौख्याचा तुझा संपून गेला

३.
शेवटी रोखून आसू हासताना
ओढ ओहोटीसही लावून गेला

प्रतिसाद

आवडले.

गुण-
१. - ८.५/१० - कल्पना आणि मांडणी दोन्ही उत्तम
२.- ४.५/१० - ???
३.- ६/१० - कल्पना चांगली.

पण पूर्ण गझल दिली असती तर या शेरांची गझलेतील जागा नक्की कळली असती.

१. मृगजळ : ८ :

१. मृगजळ : ८ : हा मस्तच आहे

२. भास : ६ : हेही आवडलं

३. रोखून आसू : ७ : यातली पहीली ओळ जबरीच आहे.

छान आहेत शेर !

१. -> ६
२. ->४
३. ->८.५

रेटींग

१) ९- मृगजळ , पावसाळा आणि काहिली हा विरोधाभास अत्यंत परिणामकारक आलेला आहे .
२) ७- दोन मिस-यांमध्ये परस्परसंबंध छान आला आहे .
३) ७-कल्पना सुरेख . पण क्लिष्ट झाला आहे .

माझे गुण!

१ - ७.५
२ - ६. सानी मिसर्‍यातली कल्पना चांगली आहे. पण "भास संपणे" हा प्रयोग नीट जमत नाहिये...
३ - ५?. उला मिसरा मस्त! पण मला सानी मिसरा कळला नाही :(
जर दिलेला शेर कळलाच नसेल तर त्या शेराबाबत माझ्यासारख्या विद्यार्थाने दिलेल्या गुणांना तसा काही अर्थ उरत नाही.
-- पुलस्ति.

हम्म

१. ८ / १०
२. ४/१०
३. ४/१०

रसिक's picture

माझे

१. ५/१० ठिक्
२. ४/१० ओढून ताणून्
३.४/१० शेर मनाला भिडला नाही

ह्म्म्म्म!!!

सगळेच शेर ठिक...
१)->७.५/१० त्यातल्या त्यात बरा...
२)->५/१० फारच मचूळ...
३)->६/१० ... 'ओहोटीस ओढ लागली'..शेर तारला गेला...
-आपले आभाळ :)

नचिकेत's picture

छान...

१. ७.५/१०
२. ४.५/१०
३. ६.५/१०

- नचिकेत आठवले

चिक्कू की उदार?

१. ७.५/१० - विरोधाभास, मांडणी आणि सहजभाव
२. ४/१० - हं...
३. ५/१० - ठीकच. उला आणि सानी चा परस्परसंबंध (मलातरी) स्पष्ट झाला नाही

आनंदयात्री's picture

१. ५/१० :

१. ५/१० : थोडा "चुकवल्या"सारखा वाटतोय शेर.. म्हणजे पावसाने गारवा दिला नाही म्हणून मृगजळ ती अपेक्षा पूर्ण करेल??
२. ३/१० : सरळमार्गी आहे...
३. ४/१० : कळला नाही... प्रत्येक ओळ स्वतंत्र कळतेय, पण दोघांचा एकत्र अर्थ नाही लागला...

१. ८/१०

१. ८/१० व्वा! त्या आसेवरच ..!
२.
३.
कळले नाहीत किंवा झेपले नाहीत.