परखड मतांची वानावा

बरेच दिवस झाले, इथेही मला परखड मतांची वानवाच दिसते आहे. गझलेविषयी किमान कल्पना, तंत्र, मांडणी इ. बाबतच्या त्रुटी, चुका दाखवायला आणि त्या मान्य करायला लोक कचरतात असा अनुभव इतर संकेतस्थळांवर येतो आणि तसाच अनुभव इथेही येत आहे. स्वघोषित कल्पनांना न्याय देण्याच्या नादात कोणत्याही काव्यप्रकाराची गळचेपी होत नाही ना याचा विचार कवी आणि रसिक दोघेही करू शकतात. गझलेची बाराखडी येथील किती सदस्यांनी वाचली आहे ? याबाबत ह्या संकेतस्थळावर वावरणार्‍या सर्वांनी विचार करावा. अन्यथा केवळ वा वा, छान छान इ. ओलेत्या शब्दांना धरून बसलो तर कवींना वा रसिकांना वा मराठी गझलेला; कोणालाच अशी व्यासपीठे उपयुक्त ठरणार नाहीत.

मान्य, विनंती

नीलहंस,
परखड मतं मांडली गेलेली दिसत नाहीत हे खरं, पण त्याचं एक कारण इथे गझल/अभिप्राय लिहीणारे बरेच जण माझ्यासारखे नवोदित आहेत, हे असेल काय?
मी इथल्या सर्वांच्या वतीने आपल्याला व इतरही आमच्यापेक्षा अनुभवी गझलकारांना आणि जाणकारांना विनंती करू इच्छिते की त्यांनी जरूर त्यांची प्रांजळ मतं सांगावीत. विशेषतः इथे गेले काही दिवस तरही गझल लिहीण्याची कार्यशाळा सुरू आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन मोलाचं ठरेल. परखड अभिप्राय/सुचवण्या यांचं स्वागतच होईल अशी मला खात्री आहे.

म्हणजे काय करायचं?

एक hypothetical situation घ्या

समजा मी आज ह्या वेबसाईटवर येतो आणि एक गझल वाचतो , त्यावर प्रांजळ मते मांडून निघून जातो . ८ दिवसांनी पुन्हा येतो आणि दुर्दैवाने त्याच गझलकाराच्या आणखी एका नवीन गझलवर प्रांजळ/ परखड मते मांडून जातो . मधल्या काळात आधीच्या गझलवरती मांडलेली मतं आणि (कदाचित) उठलेलं वादळ ह्याला उत्तरे द्यायला मला वेळ झालेला नसतो . अश्या वेळी त्या गझलकाराला मी मुद्दाम त्याच्याच रचनांची चिरफाड करतोय की काय असे वाटू शकत नाही काय ? सध्या इथे लिहीत असलेले सर्वच मित्र आणि येणारे नवीन गझलकार स्वतःचे असे मत न होऊ देण्याच्या बाबतीत दक्ष असतील काय? त्याने नाऊमेद होणार नाहीत काय? म्हणून कामचलाऊ गझलना प्रोत्साहन दिले जातेय असे नाही. आपापल्या परीने प्रत्येकजण प्रशंसा करतोय तसेच विनम्र भाषेत शंकाही विचारतोय . हे पुरेसे नाही काय? सतत आणि सतत जर कुणी इथे लिहील्या जाणा-या बहुतांशी रचनांना वेळ देऊ शकत असेल आणि नंतर अभ्यासपूर्ण स्पष्ट मतं मांडू शकत असेल तर ठीक आहे . नाहीतर सध्या ज्याप्रमाणे लोकांना जितका वेळ असतो त्यानुसार एकतर समोरच्या रचनेत चांगल काय आहे ते बघायचं , प्रोत्साहन द्यायचं , एखादी शंका असेल तर विचारायची आणि दखलपात्र रचना नसेल तर निघून जायचं हे काय वाईट आहे? ६ शेरांपैकी दोनच शेरांचा उल्लेख करून प्रतिसाद दिला जातो हे ओलेते प्रतिसाद कसे? उरलेले चार आवडले नाहीत का असा प्रश्न गझलकाराला पडत नसेल असे म्हणणे आहे काय? बरं , हे अमुक तमुक २ विशेष आवडले आणि गझल एकंदरीत छान असे म्हटले तर ज्याला शिकण्याची आस आहे , पुढे जायचे आहे ,त्याला ते २ सोडून उरलेले का विशेष ठरले नाहीत असे प्रश्न पडत नसतील काय? परखड हा फारच तीव्र शब्द आहे . प्रामाणिक म्हणू. एक संपूर्ण आठवडा पोस्ट झालेल्या सर्व रचनांवर एक न एक शेर घेऊन व्यवस्थित लिहीणे ज्याला जमेल त्याची एक अभ्यासू म्हणून इमेज तयार होईल आणि नंतरही ह्या गोष्टींसाठी वेळ देत रहावं लागेल . हे शक्य आहे का?

तुमची तळमळ मला समजते नीलहंस पण माझ्यामते जसे कुणी एका मैफलीनंतर जग जिंकल्याचा आव आणू नये तसेच एका रचनेवरचे प्रतिसाद वाचूनही करू नये . साधारण सर्वांना आपली ही रचना पटली इतकाच अर्थ घेतला तरी पुरेसा आहे जेणेकरून उरलेला वेळ सुखावून जाण्यापेक्षा " मग काय काय आवडलं नाही ते तरी बघू" अश्यात सत्कारणी लावलेला बरा.

दुसरं असं आहे की पाहिलेल्या ब-याच वेबसाईटपैकी ह्या साईटवर सुदैवाने खूपश्या दर्जेदार गझल पोस्ट होतात त्यामुळे ८०% प्रतिसाद वा ! छान असणारच . आणि रोज रोज प्रतिसाद देताना वा ! छान ! अप्रतिम पलिकडे शब्द तरी कुठले आणायचे?त्यांना केवळ ओलेते म्हणून कसं काय चालेल?

परखड लिहीण्यासाठी प्रचंड अभ्यासाची गरज असते आणि इथे (किंवा सगळीकडेच )तर ब-यापैकी सगळेच शिकाऊ आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे समजावत / समजून घेत शिकण्याकडे कल जास्त असतो असे मला वाटते .

माझ्यामते इंटरनेट वर अदृश्य राहता येण्याचे जसे फायदे आहेत (कंटकांना ) तसेच तोटेही आहेत(साध्या लोकांना) . नुसत्या लिहीलेल्या परखड शब्दांत आणि समोर बसून मांडलेल्या परखड मतात खूप फरक पडतो हो . एक म्हणजे समोर एक खराखुरा , त्याच नावाचा जिवंत माणूस बसलाय आणि केवळ काव्याबद्दलची कळकळ ह्याच हेतूने सांगतोय हे आपल्या डोळ्यांना दिसत असतं/ जाणवत असतं. इथे ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही इथूनच शंका , मग तिचं मोटिव्ह काय याची शंका, मग तिची लायकी काय याची शंका , मग ते प्रांजळ मांडलंय की कुत्सित आहे याची शंका . मला वाटतं याच कारणामुळे हे असंच चालत राहणार. प्रत्येक रचनेवर प्रांजळ मत आणि थेट शंका आल्या तर मलाही आनंद वाटेल यात शंकाच नाही पण आताची मतंही प्रांजळच आहेत आणि शंकाही थेटच आहेत फक्त हे सगळं सौम्य भाषेत चालतं (जे योग्य आहे ) असं माझं परखड मत. :-)

शेवटी एक " निर्विवाद अप्रतिम " रचना लिहून झाल्यानंतर आपण स्वतः जेव्हा ती वाचतो आणि त्याला काही गुण देतो त्या गुणांमध्ये आणि इतर सर्व जगाने दिलेल्या गुणांच्या सरासरीत अगदीच तोळामासा फरक असतो असे आपले माझे मत. सर्व मित्रांचे प्रतिसाद आनंदाने वाचावेत , सुचवलेल्या सुधारणांवर विचार करावा ., पटलं तर बदल करावा , जाहीरपणे मान्य करावा , नाही पटलं तर सोडून द्यावा . पुढची रचना ......

काय म्हणता?

"मधल्या

"मधल्या काळात आधीच्या गझलवरती मांडलेली मतं आणि (कदाचित) उठलेलं वादळ ह्याला उत्तरे द्यायला मला वेळ झालेला नसतो . "
असे होते, ह्याला उपाय सुचवणे मला तरी शक्य नाही :)

"अश्या वेळी त्या गझलकाराला मी मुद्दाम त्याच्याच रचनांची चिरफाड करतोय की काय असे वाटू शकत नाही काय ?"

असे वाटू लागणे हीच खरी चूक आहे. एखाद्याने मला बदल सांगितले/चूक दाखवली तर ते पटेपर्यंत त्या व्यक्तीचा पाठपुरावा करता येतो/ करावा असे मला वाटते. याचसाठी तर अश्या व्यासपीठांची गरज आहे. संकेतस्थळ नसते तर माझी एखादी गझल मी किती जणांना ऐकवू शकलो असतो हाही प्रश्नच आहे नाही का?

"सध्या इथे लिहीत असलेले सर्वच मित्र आणि येणारे नवीन गझलकार स्वतःचे असे मत न होऊ देण्याच्या बाबतीत दक्ष असतील काय? त्याने नाऊमेद होणार नाहीत काय? "

हे व्यक्तिसापेक्ष आहे. विचारसरणी बदलायला नको का? दुसर्‍याच्या चुका कोणासही पटकन दिसतात. स्वत:च्या चुका कबूल करणे हे तितकेच कठीण. म्हणूनच बर्‍या-वाईट सगळ्या मतांचा फायदा करून घेणे प्रत्येकाच्या हातात आहे. एखादी व्यक्ती चुका दाखवते म्हणून त्याची मते घेऊच नयेत हा टोकाच विचारही मारकच ठरतो.

"म्हणून कामचलाऊ गझलना प्रोत्साहन दिले जातेय असे नाही. आपापल्या परीने प्रत्येकजण प्रशंसा करतोय तसेच विनम्र भाषेत शंकाही विचारतोय . हे पुरेसे नाही काय?"

ह्याचे उत्तर व्यक्तिसापेक्ष आहे. मला विचाराल तर मी हे पुरेसे नाही असे म्हणेन. कारण वरील प्रश्नात प्रत्येकजण ह्या शब्दाची व्याप्ती इतकी मोठी नाही. त्याचबरोबर शंका,त्रुटी,सुधारणा,बदल ह्यात फरक आहे. असो. ...मतिर्भिन्ना. :)

"सतत आणि सतत जर कुणी इथे लिहील्या जाणा-या बहुतांशी रचनांना वेळ देऊ शकत असेल आणि नंतर अभ्यासपूर्ण स्पष्ट मतं मांडू शकत असेल तर ठीक आहे ."

सहमत आहे. एकाच व्यक्तीला हे अशक्य आहे. म्हणूनच म्हणतो हे एका माणसाचे काम नोहे.

नाहीतर सध्या ज्याप्रमाणे लोकांना जितका वेळ असतो त्यानुसार एकतर समोरच्या रचनेत चांगल काय आहे ते बघायचं , प्रोत्साहन द्यायचं , एखादी शंका असेल तर विचारायची आणि दखलपात्र रचना नसेल तर निघून जायचं हे काय वाईट आहे?

नाही , वाईट नाही :)
चांगल्याला वाईट म्हणण्याइतका मी वाईट नाही :)
पण एखाद्या शेरातला एखादा शब्द रुचला नाही तर तसे मत मांडावे असे मला वाटते. त्याचबदल्यात इतर चार जणांकडून आणखी चार शब्द कळतात.

"६ शेरांपैकी दोनच शेरांचा उल्लेख करून प्रतिसाद दिला जातो हे ओलेते प्रतिसाद कसे? उरलेले चार आवडले नाहीत का असा प्रश्न गझलकाराला पडत नसेल असे म्हणणे आहे काय? "

असे नाही. पण मला आवडेल तो शेर दुसर्‍याला आवडेलच याची खात्री नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकाला सर्वच शेरांवर प्रतिसाद देण्याकरता वेळ काढावा लागू शकेल. इतका वेळ प्रत्येकाजवळ असेलच असे नाही. पण त्यात ज्या शेरांमध्ये "पंच" आहे असे शेर अथवा जे वाचल्या वाचल्या मनाचा ठाव घेतात असे शेर अथव जे वाचताना फार अडखळायला होतं असे शेर हे प्रत्येकजण वेगळे काढतच असतो. प्रत्येक शेर स्वतंत्र असल्याने ६ पैकी २ अथवा ६ पैकी ४ अशा गणितांना काही अर्थ नाही.

"बरं , हे अमुक तमुक २ विशेष आवडले आणि गझल एकंदरीत छान असे म्हटले तर ज्याला शिकण्याची आस आहे , पुढे जायचे आहे ,त्याला ते २ सोडून उरलेले का विशेष ठरले नाहीत असे प्रश्न पडत नसतील काय? "

हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा. गझल लिहितानाच आपण कोणत्या शेरात शब्द चोरतो आहोत, कोणत्या शेरात कल्पनेला मूठमाती देतो आहोत, कोणता शेर आपण ४-५ वेळा लिहिल्यावरच पसंतीस उतरला होता हे प्रत्येकालाच ठाऊक असते. एखादा शेर विषेश ठरला नाही म्हणून हताश होण्यात काहीच हशील नाही. कशामुळे तो विषेश ठरला नाही हे समजून घेणे महत्त्वाचे. जेणे करून पुढच्या वेळी करता "लेसन्स लर्न्ड" ची बेगमी.

"परखड हा फारच तीव्र शब्द आहे . प्रामाणिक म्हणू. एक संपूर्ण आठवडा पोस्ट झालेल्या सर्व रचनांवर एक न एक शेर घेऊन व्यवस्थित लिहीणे ज्याला जमेल त्याची एक अभ्यासू म्हणून इमेज तयार होईल आणि नंतरही ह्या गोष्टींसाठी वेळ देत रहावं लागेल . हे शक्य आहे का? "

नाही. मी असे कधीच म्हटले नाही की कोणा एकाच व्यक्तीने ह्याचा मक्ता घ्यायला हवा. संकेतस्थळासारखे ठिकाण जेथे १० प्रकारे विचार करणारे १० लोक आपली मते मांडू शकतात यासाठी व्यासपीठ ठरावे असे माझे मत आहे, आग्रह नाही.

"पण माझ्यामते जसे कुणी एका मैफलीनंतर जग जिंकल्याचा आव आणू नये तसेच एका रचनेवरचे प्रतिसाद वाचूनही करू नये ."

हे आपण नक्की कोणास उद्देशून म्हटले आहे ते कळवावे. रचना ही रचना आहे, मला गझलेतील प्रत्येक शेर पटेलच असे नाही. नुसते प्रतिसाद वाचून आपले मत बनवू नये हे मान्य. पण प्रतिसाद वाचल्याने आपण कधी न केलेले विचार करण्यास उद्युक्त होत असल्यास असे प्रतिसाद नक्कीच महत्त्वाचे ठरावेत.

साधारण सर्वांना आपली ही रचना पटली इतकाच अर्थ घेतला तरी पुरेसा आहे जेणेकरून उरलेला वेळ सुखावून जाण्यापेक्षा " मग काय काय आवडलं नाही ते तरी बघू" अश्यात सत्कारणी लावलेला बरा.

ह्यासाठी काय आवडले नाही अयबरोबरच का अवडले नाही याची माहिती प्रतिसादात नको का?

दुसरं असं आहे की पाहिलेल्या ब-याच वेबसाईटपैकी ह्या साईटवर सुदैवाने खूपश्या दर्जेदार गझल पोस्ट होतात त्यामुळे ८०% प्रतिसाद वा ! छान असणारच .

:) असे असे.

" आणि रोज रोज प्रतिसाद देताना वा ! छान ! अप्रतिम पलिकडे शब्द तरी कुठले आणायचे?त्यांना केवळ ओलेते म्हणून कसं काय चालेल? "

का नाही आणता येत? इथे चर्चा करताना, इतके शब्द वापरलेच की आपण!!! एखादा शेर मला का आवडला अथवा एखादा शब्द का खटकला हे सांगायलाही शब्द सापडू नयेत इतकी मराठीची, मराठी माणसाची आणि त्याच अनुषंगाने मराठी गझलेची अवस्थ बीकट नक्कीच नाही.

"परखड लिहीण्यासाठी प्रचंड अभ्यासाची गरज असते आणि इथे (किंवा सगळीकडेच )तर ब-यापैकी सगळेच शिकाऊ आहेत. "

अभ्यासाची गरज नाहीच असे नाही. पण आंबा गोड आहे अथवा उतरला आहे किंवा अजून पिकला नाही हे सांगायला अभ्यास करावा लागत नाही. चव, आवड ह्याबाबतीत अभ्यास आड येऊ नये.
"माझ्यामते इंटरनेट वर अदृश्य राहता येण्याचे जसे फायदे आहेत (कंटकांना ) तसेच तोटेही आहेत(साध्या लोकांना) . नुसत्या लिहीलेल्या परखड शब्दांत आणि समोर बसून मांडलेल्या परखड मतात खूप फरक पडतो हो . एक म्हणजे समोर एक खराखुरा , त्याच नावाचा जिवंत माणूस बसलाय आणि केवळ काव्याबद्दलची कळकळ ह्याच हेतूने सांगतोय हे आपल्या डोळ्यांना दिसत असतं/ जाणवत असतं. इथे ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही इथूनच शंका , मग तिचं मोटिव्ह काय याची शंका, मग तिची लायकी काय याची शंका , मग ते प्रांजळ मांडलंय की कुत्सित आहे याची शंका ."

:)
माझा इमेल पत्ता: josh9383@gmail.com
माझे नाव : ॐकार जोशी
पत्ता आणि संपर्काची माहिती हवी असल्यास कोणीही मेल करून विचारावे.

आडून वार करणार्‍यांबाबत मला काही म्हणायचे नाही. प्रतिसाद अबक ने दिला आहे की कखग ने ह्याच्याशी देणे घेणे ठेऊ नये. मत महत्त्वाचे, पटले तर बघावे, विचार करावा, पाठपुरावा करावा अन्यथा सोडून द्यावे. असो . हे माझे मत. प्रत्येकाला पटेलच असे नाही.

" मला वाटतं याच कारणामुळे हे असंच चालत राहणार. प्रत्येक रचनेवर प्रांजळ मत आणि थेट शंका आल्या तर मलाही आनंद वाटेल यात शंकाच नाही पण आताची मतंही प्रांजळच आहेत आणि शंकाही थेटच आहेत फक्त हे सगळं सौम्य भाषेत चालतं (जे योग्य आहे ) असं माझं परखड मत. :-)"

:|

शेवटी एक " निर्विवाद अप्रतिम " रचना लिहून झाल्यानंतर आपण स्वतः जेव्हा ती वाचतो आणि त्याला काही गुण देतो त्या गुणांमध्ये आणि इतर सर्व जगाने दिलेल्या गुणांच्या सरासरीत अगदीच तोळामासा फरक असतो असे आपले माझे मत. सर्व मित्रांचे प्रतिसाद आनंदाने वाचावेत , सुचवलेल्या सुधारणांवर विचार करावा ., पटलं तर बदल करावा , जाहीरपणे मान्य करावा , नाही पटलं तर सोडून द्यावा . पुढची रचना ......

काय म्हणता?
दुमत नाही. "सुचवलेल्या सुधारणांवर विचार करावा " हे कागदावर किती आणि वास्तवात किती याबाबत मी माझे मत मांडले होते.असो. दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.