संकेत

विसुनाना's picture

मराठी गझलेतले सर्वमान्य संकेत कोणते?

स्वाती's picture

गहन प्रश्न

कुणीच उत्तर दिलं नाही अजून?
मलाही हे समजून घ्यायचंय.

पुलस्ति's picture

काही उत्तरे..

फारच कठिण प्रश्न आहे. सुरेशभट.इन या साइटवर हे आढळले -
http://www.sureshbhat.in/node/154
संबंधित वाटले..
-- पुलस्ति.

स्वाती's picture

धन्यवाद !

चांगली लिंक आहे.
धन्यवाद, पुलस्ति.

विसुनाना's picture

पण माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.

लेख पूर्वीच वाचला होता. त्या लेखात मराठी संकेतांबद्दल काहीच नाही. ती गोष्ट अलाहिदा.
इथल्या माझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर राहूनच गेले.

पुलस्ति's picture

हो...

त्या लेखात मराठी संकेतांबद्दल नक्केच काही नाहिये नाना. पण गझलेच्या संकेतांबद्दल आहे.. "मराठी" जाऊ दे पण "गझलेचे" संकेतही मला नीटसे माहीत नव्हते. म्हणून लेख मला उपयुक्त वाटला आणि लिंक दिली. तुमचा मूळ प्रश्न अजून अनुत्तरीत आहेच :)
-- पुलस्ति.

वैभव's picture

मराठी गझल लिहीताना मी पाळत असलेले संकेत

विसूनाना ,

कवीवर्य सुरेश भटांच्या बाराखडीशिवाय दुसरे संकेत मला माहीत नाहीत . पण मला असे वाटते की फक्त नियमावलीपेक्षाही आणखी काही संकेत आहेत जे कळत नकळत पाळले जातात .

मी काय म्हणतो , आपण सगळे रोज गझल लिहीतोच की आणि ते ही नियमावली व असे अलिखित संकेत पाळून . जोपर्यंत असे लिखित संकेत कुठे सापडत नाहीत तोपर्यंत आपण सर्व जण आपल्याला माहीत असलेले संकेत लिहून काढू. संदर्भ सापडला (च) तर तपासून पाहू ? काय म्हणता? मी तर सुरू करतो . चू. भू. दे. घे .

मला पाळावेसे वाटणारे मराठी गझल लिहीण्याचे सर्वसाधारण संकेत (आधार गुरुवर्य सुरेश भट )

१) प्रत्येक गझलमध्ये किमान पाच शेर असावेत.
२) प्रत्येक शेर दोन ओळींचा असावा .
३) प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असावी . म्हणजेच फक्त एक शेर वाचला तरीही त्या दोन ओळींतून एक परीपूर्ण विचार समोर यावा .

उदा.:-
तसे म्हणाया समोर ,अगदी समोर होते बरेच रस्ते
परंतु काही न बोलले अन निघून गेले पुढेच रस्ते

४) प्रत्येक ओळीत समान मात्रा असाव्यात . लघु गुरूचा क्रमही पाळणे जमले तर अगदीच उत्तम.
५) एका दीर्घ अक्षराऐवजी दोन लघु अक्षरे लिहीणे ही सर्वमान्य सूट आहे . परंतू सूट एकाच शब्दसमूहात घ्यावी . म्हणजे एका शब्दातले शेवटचे अक्षर व दुस-या शब्दातले पहिले अक्षर लघु मिळून एक गुरू असे शक्यतो करू नये . येथे लय बिघडण्याचा संभव असतो .
६) ओळीतील यतीभंगाची जाणीव लिहीताना असणे उत्तम त्याचा विशेष बाऊ केला जाऊ नये हे जरी खरे असले तरी निदान दोन यतींनंतर थांबताना शब्द पूर्ण झालेला असावा.
जसे कवीवर्य भटांची रचना

अता राहिलो मी जरासा जरासा
उरावा जसा मंद अंती उसासा.

याचे गट पाडले तर

अतारा | हिलो मी | जरासा | जरासा
उरावा | जसा मं | दअंती | उसासा

किंवा

अता राहिलो मी | जरासा जरासा |
उरावा जसा मंद | अंती उसासा

इथे यती येतो तेव्हा तोपर्यंत आलेल्या शब्दांचा अर्थ तर लागतोच पण पुढे काय आहे याची उत्कंठाही वाढते.

७) प्रत्येक शेरात अंत्ययमक व यमक आवश्यक आहे . मतल्यात दोन्ही ओळीत ते आवश्यक आहे. . अलामत भंग (शक्यतो करू नये ) आवश्यक असल्यास मतल्यातच करावी .

८) वेगवेगळ्या विषयावरचे शेर लिहीतानाही पूर्ण रचनेचा एखादा मूड सांभाळला गेल्यास उत्तम . म्हणजे चीडच दाखवायची असेल तर आयुष्य , प्रेम , प्रेयसी, नशीब , समाजव्यवस्था अश्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत शेर लिहीता यावेत .

९) गझल म्हणजे विरोधाभास , दारू , निराशा , प्रेमभंग , प्रेम असे नसून नवनवीन विषय हाताळले जावेत . तसेच नवनवीन शब्दांत कल्पना मांडल्या जाव्यात .

१०) फक्त सुटसुटीत शब्दात लिहीलेले शेर म्हणकेच गझल किंवा फक्त क्लिष्ट लिहीलेले शेर म्हणजेच अर्थपूर्ण शेर असा कुठलाही समज मनात न बाळगता आपल्याला जे म्हणायचे आहे ते आपल्याला योग्य वाटणा-या शब्दांत व्यक्त करून समोरच्या व्यक्तीपर्यंत ते पोचेल
हा प्राथमिक विचार मनात असावा .

११) कुठलाही शेर किंबहुना ओळ लिहीताना भरीचे शब्द टाळावेत . हे , तो , की , अन ... असे शब्द अपरिहार्य असतानाच यावेत आणि त्यांनी त्या ओळीचा अर्थ पुढे जातोय का आणि सौंदर्य वाढते आहे का याचा विचार केला जावा .

१२) शेर गोटीबंद असावेत. शब्दबंबाळ शेर वाचकाला दूर नेतात . मला इथे सणवाराला सुवासिनी रांगोळीची पावले उमटवण्यासाठी जी जाळी वापरतात त्याचे उदाहरण द्यावेसे वाटते . त्या जाळीत रांगोळी जरी भरपूर असली तरी उमटताना सुबक पावले उमटतात . तसे आपले विचार , शब्दसंग्रह यांच्या रांगोळीला योग्य त्या जाळीतून गाळून सुबक शेर उमटावेत .

१३) प्रत्येक शेरवर " हां , याच्यापुढे ही कल्पना इतक्या कमी शब्दांत इतकी चपखल माझ्याकडून लिहीलीच जाऊ शकत नाही " असे वाटेपर्यंत विचार केला जावा. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे " कविता/ गझल लिहीण्याची घाई करू नये आणि ती प्रसिध्द करण्याची तर मुळीच घाई करू नये "

१४) वेगळे रदीफ वापरले म्हणजेच उत्तम गझलकार झालो असे नव्हे तर त्या त्या रचनेला , विचाराला सुंदर रूप देण्यासाठी जे योग्य आहे ते वापरावे . " आहे , होतो , नाही " वगैरेसारखे रदीफ अनेकदा इतरांकडून व स्वतःकडूनही वापरले गेल्याने टाळणे हा पर्याय होऊ शकत नाही . उदा, :-

तू असे जाळून मी जळणार केव्हा?
सांग हा कापूर दर्वळणार केव्हा?

मध्ये " जळणार केव्हा , दर्वळणार केव्हा " हे चावून चोथा झालेले काफिये रदीफ आहेत पण म्हणून आपल्याला जे म्हणायचंय ते बदलत बसण्याचा अवास्तव प्रयास करत बसू नये . ह्याहून उत्तम व वेगळे सुचले तर सोन्याहून पिवळे .

१५) ह्या सर्व नियमांच्या अध्येमध्ये कुठेतरी प्रसन्न शेंबेकरने लिहील्याप्रमाणे वजन असणे गरजेचे आहे . त्यासाठी गझलेची तबीयत (गझलियत ?) असावी लागते हे माझे अत्यंत आवडते मत . म्हणजे नक्की काय ह्या गोष्टीवर नक्की बोट ठेवता येत नसल्याने ब-याच वेळा अश्या विधानांची खिल्ली उडण्याचाच संभव असतो पण एखादी गझल आपल्याला का आवडते आणि दुसरी का आवडत नाही ह्याचा आपली आवडनिवड क्षणभर बाजूला ठेवून निस्पृहतेने विचार केला तर हा फरक लक्षात येऊ शकतो असे मला वाटते .

१६) सुदैवाने गझल हा एक असा काव्यप्रकार आहे की ज्यात तुम्ही एक विचार / शेर लिहून पुढचा उत्स्फूर्त विचार त्या आकृतीबंधात सुचेपर्यंत वर्षानुवर्षे थांबू शकता . म्हणूनच १३व्या मुद्यातील भटांचे म्हणणे गझल लिखाणासाठी आणखी चपखल वाटते .

१७) सोप्या व सहजसुंदर शब्दांत लिहीतानाही काव्य जपणे आवश्यक आहे म्हणजे शेर वृत्तांतात्मक होत नाही . उदा.:-

पावसाचा रंगला दरबार होता
आसवांनी छेडला मल्हार होता

इथे उला मिस-यात जरी वृत्तांतात्मक सुरुवात झाली तरीही " आसवांनी मल्हार छेडणे " ही काव्यकल्पना सहज व्यक्त झाली आहे ,(असे मला वाटते . अशी स्वतःची सगळी उदाहरणे देणे खचितच योग्य नाही पण मी इतर कुणाच्या कल्पनांवर इतक्या अधिकारवाणीने बोलू शकत नाही . त्यामुळे क्षमस्व )

१८) गुरुवर्य सुरेश भटांच्या गझल जर पुन्हा पुन्हा वाचल्या तर त्यातून दिसणारी कलंदरी, तरलता, बेदरकारी (कधी कधी एकाच गझलेत हे सगळे आविष्कार ) स्तिमित करून जाते . हे त्या माणसाचं त्या वेळचं थेट प्रतिबिंब हे जाणवत राहतं. गझल म्हणजे फक्त सर्वांच्या विरुध्द लिहीण्यासाठी हाती मिळालेलं हत्यार किंवा गझल म्हणजे फक्त रडण्यासाठी मिळालेले रेडिमेड खांदे अश्या प्रकारच्या रचना लिहील्या जाऊ नयेत या साठी सर्व गझलकारांनी सावध असणं गरजेचं आहे .

१९) उर्दूतून गझल आपल्याकडे आली (यावरही वाद आहेत. परवाच कुणीतरी मला सांगितले की काही वर्षांपुर्वी असा एक लेख प्रसिध्द झाला होता ज्यात संस्कृत श्लोकांची उदाहरणे दिली गेली होती . ह्या सर्व श्लोकांमध्ये रदीफ काफिये सांभाळले गेले आहेत आणि जे उर्दूत गझल लिहीली जाण्यापुर्वी लिहीले गेले आहेत. असो. तो भाग वेगळा. ) आणि उर्दूत अलामत वगैरे कुठे पाळली जाते म्हणून आपण न पाळणे हा ज्याचा त्याचा विचार आहे . माझ्यामते मराठी गझल म्हटले की मला सुरेश भट आठवतात , त्यांनी घालून दिलेले पाठ आठवतात . ह्या जन्मी तरी इतकेच पुरे आहे . आणि तसेही कुठल्याच जन्मी त्यांच्याइतके सकस लिखाण हातून घडण्याची चिन्हे नाहीत , इच्छाही नाही आणि लायकीही असेल असे वाटत नाही . अर्थातच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . नवीन काही आलं तर उत्तमच पण त्यामागे तितका अभ्यास , पुढे येणा-या शंकांचे निरसन करण्याची तयारी , ती कल्पना , तो आकृतीबंध यशस्वीपणे पेलण्याची , शिकवण्याची तयारी हे सगळंच हवं.

२०) वाह वा ! क्या बात है अशी दाद घेणारे शेर काय किंवा आह ! अशी दाद घेणारे शेर काय , दोन्ही तितकेच परिणामकारक असतात असे मला वाटते . ह्यातील परिणामकारक हे एकच परिमाण महत्त्वाचे .

शेवटी...

ही सगळी माझी मतं आहेत. हे सगळे संकेत पाळण्याचा मी प्रयत्न करतो . हे सर्व विचार सुरेश भटांच्या गझल लिहीण्याच्या संकेतावरच बहुतांशी आधारले आहेत . फरक इतकाच आहे की समोर गुरुजी नसताना दोन विद्यार्थी एकमेकांशी बोलतात तेव्हा आणखीन finer details मध्ये बोलतात , process बद्दल बोलतात , तसा मी सर्वं मित्रांशी बोललो आहे. इतकं सगळं लिहीण्याच्या स्थानावर मी नक्कीच पोचलो नाहीये पण हा प्रश्न भिजत पडला होता आणि कुणीतरी चर्चेला सुरुवात करणे गरजेचे होते म्हणून हा प्रपंच . बाकी ...

कुणा पटते , कुणा नाही मला माहीत नाही
परंतू मी खरे बोलावयाला भीत नाही .

:-)

चित्तरंजन भट's picture

माझे मत

विसुनाना आधी तुम्हाला संकेत म्हणजे काय म्हणायचे आहे ते समजून घ्यायला आवडले असते.

उर्दू गझलेचे जे संकेत आहेत तेच मराठी गझलेचे संकेत आहेत. फक्त मराठी गझल मराठमोळी वाटायला हवी. आणि हे सगळे संकेत "गझलेच्या बाराखडी"त आणि अशाच प्रकारच्या पुस्तक-पुस्तिकांत नमूद आहेत. गझलेच्या बाराखडीतले "महत्त्वाचे" वाचावे.

lakado's picture

वाळूत

वाळूत चातकाला का चांदणे दिसावे?
की धूर्त मृगजळाने चोरून चांद नेला?
Sequined Homecoming Dresses
Taffeta Homecoming Dresses
Tulle Homecoming Dresses
Halter Homecoming Dresses
One Shoulder Homecoming Dresses
Spaghetti Straps Homecoming Dresses
Strapless Homecoming Dresses
Straps Homecoming Dresses
Sweetheart Homecoming Dresses
V Neck Homecoming Dresses
A Line Homecoming Dresses
Ball Gown Homecoming Dresses
Mermaid Homecoming Dresses
Sheath Homecoming Dresses
Short Sleeve Homecoming Dresses
Sleeveless Homecoming Dresses
Asymmetrical Homecoming Dresses
Floor Length Homecoming Dresses
Knee Length Homecoming Dresses
Tea Length Homecoming Dresses
ऐन्यास वेड लागे पाहून त्या परीला
पार्‍यास पंख आले, काचेस छेद गेला

पाहून वेष माझा थुंके जरी भिकारी
मी दावताच नोटा राजा झुकून गेला

ऐकून बातम्या 'त्या' खात्री कशी पटेना?
आताच ते म्हणाले,"मेला, समाज मेला!"

विसुनाना's picture

मराठी गझलेतले सर्वमान्य संकेत

खरीखुरी मराठी गझल मा. कविवर्य भटसाहेबांनी प्रथम लिहिली याबद्दल कुणाचेही दुमत असणे शक्य नाही. त्यांनी नुसती दर्जेदार गझल लिहिली नाही तर तिची पाळेमुळे या मराठी धरतीत खोलवर रुजावीत म्हणून अपार कष्ट केले. उभ्या प्रस्थापित कविमंडळाशी टक्कर दिली. स्वखर्चाने अनेकानेक नव्या गझलकारांना मार्गदर्शन केले. मराठी काव्याचे एक बलस्थान म्हणून गझलेला उभे करण्यात त्यांना यश मिळाले.
माझ्यासारखा एक यक:श्चित आजमितीला त्यांच्या या कार्याचा साधा अंदाजसुद्धा लावू शकणार नाही हे निश्चित! त्यांनी वेळोवेळी लिहिलेली गझलची परिभाषा ही मलाच काय पण इतर कोणत्याही नव्या गझलकाराला जन्मभर पुरून उरेल अशी देणगी आहे. त्यामुळे आज माझ्या गझलांमधे असलेले दोष माझ्या करंटेपणाचीच उदाहरणे आहेत हे ही निश्चित!
नामांकित गझलकार श्री. प्रसन्न शेम्बेकर आणि श्री. वैभव जोशी यांनी सांगितलेले 'मराठी गझलेचे संकेत' हे मला शिरसावंद्य आहेत आणि तशी गझल लिहिण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेनच हे ओघाने आलेच.
माझा येथील प्रश्न 'मराठी गझलेतल्या' संकेतांबद्दल होता. मराठी भाषेत असे काही खास संकेत आहेत - उदा. कावळा घरावर बसून ओरडणे, कांकणे वाढणे,उंबराचे फूल इ. अनेक वाक्प्रचार. उर्दु गझल/शायरीचा माझा अभ्यास जवळ्जवळ शून्य आहे. तरीही , साकी और पैमाना , बुल्बुल और सैयाद असे असलेले अनेक शेर कानावर पडतात. नव्या शायरीत शहर, अन्धा कुआ, सहारा इ.(चू.भू.दे.घे.)
गेली जवळजवळ पन्नास वर्षे मराठी भाषेत गझल लिहिली जात आहे असे म्हणायला हरकत नसावी. माझा प्रश्न एवढाच आहे की मराठी गझलेत आतापर्यंत असे काही संकेत सर्वमान्य झाले आहेत का? हा प्रश्न पडण्याचे कारण असे की मी आतापर्यंत ज्या कांही मराठी गझला वाचल्या त्यांत गाव, पूर, वैशाख, मारेकरी, चोर ,वादळ, धुके अशा काही प्रतिमा वाचनात आल्या. या प्रतिमा आता संकेतात बदलल्या आहेत असे म्हणता येईल काय? असे असेल तर त्या कोणत्या आणि त्यांचा नेमका भावार्थ काय?
हा प्रश्न विचारण्याचे कारण इतकेच की माझ्यासारख्या नव्या गझलकारांना त्या गझलांकडे डोळसपणे बघता यावे. आणि स्वत: केलेल्या गझलांमधे त्या संकेतांचा प्रभावीपणे वापर करता यावा.
असा अभ्यास जाणकारांनी केला असेलच. कृपया आपल्या ज्ञानाचा लाभ माझ्यासारख्या होतकरू गझलकारांना करून द्यावा ही नम्र विनंती.

गझलच्या संकेतांबद्दल सविस्तरपणे सांगितल्याबद्दल श्री. वैभव जोशी यांचे पुन्:श्च आभार..

अलका काटदरे's picture

संकेत्

छान समजावून सांगीतले आहे. प्रामुख्याने गझल ही एक नैसर्गिक प्रकिया असावी आणि नियमांचा अति उहापोह टाळावा, हे मनापासून पटले. संकेत हे पाळण्यासाठी असून्, लादण्यासाठी नसावेत व प्रत्येक गझलेची आपली एक शैली असावी,हेही मन्:पुर्वक. भूषण यांनीही एका ठिकाणी केलेली अशीच सविस्तर चर्चा नवोदिताना मार्गदर्शक नक्कीच ठरावी.

धन्यवाद सर्वांचे.

michaeljii's picture

Great Post

इस पोस्ट वास्तव में इस विषय पर उल्लेखनीय मधुर. मैं अपने निष्कर्ष के साथ मिलाना और thirstily अपनी आने वाली अद्यतन करने के लिए तत्पर हैं. धन्यवाद कह रही है अभी पर्याप्त नहीं आपके लेखन में अभूतपूर्व स्पष्टता के लिए, हो जाएगा. मैं सीधे अपने आरएसएस फ़ीड हड़पने के लिए किसी भी अद्यतन के बारे में सूचित रहेगी. सराहनीय काम करने और अपने व्यापार सौदों में ज्यादा सफलता? कृपया मेरे गरीब अंग्रेजी बहाने के रूप में यह मेरी पहली भाषा नहीं है.
सादर,
ita watch\j springs watch\jacques farel watch\jacques lemans watches review\jaeger lecoultre watches\sean jean watches\jet set watch
माइकल | | आईटी परामर्शदाता | | NYC.USA

flemming22's picture

गज़ल

गज़ल लिहीताना वृत्त पाळणं आवश्यक आहे हे तुमचं मत बरोबर आहे.
वृत्त दोन प्रकारची असतात. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त.
अक्षरगणवृत्तात लघू गुरूंचा (-हस्व आणि दीर्घ उच्चार होणारी अक्षरे) क्रम रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळावा लागतो, तर मात्रावृत्तात प्रत्येक ओळीतील मात्रांची संख्या सारखी असावी लागते.mcts 70-653
mcts 70-620
mcts 70-630
n+ n10-004
windows 7 70-680
646-205 CSE
642-813 switch
642-902 route
icnd 1 640-822
icnd 2 640-816
642-832 tshoot
QOS 642-642
640-863 DESGN
642-374 CXFS
640-553 IINS