गझलेचे उद्दिष्ट काय?

गझलचे उद्दिष्ट काय असते?
गझल का लिहिली जाते?
स्वान्तसुखाय? की श्रोत्यांच्या सह-अनुभूतीसाठी?
गझल सहजसोपी का असावी?
गझलचा/शायरीचा अर्थ प्रत्येक श्रोत्याला कळलाच पाहिजे का?

"मरुभूत रेंगणार्‍या सरड्यास माहिती आहे
त्रिज्येतच फक्त जिभेच्या अर्थाची वस्ती आहे"

असले काव्य गझलेत चालते काय?
मी गझल प्रांतात खरोखर नवीन आहे.आणि मला क्लिष्ट लिहायला आवडते म्हणून विचारले.
कृपया ज्ञानवंतांनी उत्तर द्यावे.

प्रतिसाद

गझल आणि कविता

ज्ञानवंत म्हणुन नाही, सहज उत्तर लिहावसं वाटलं म्हणुन लिहीते.
असा प्रश्न का पडावा हेच खरं तर कळलं नाही. गझल ही पण शेवटी एक कविता आहे. गझलेच्या नियमांनी व्याकरणानी बांधलेली कविता म्हणजेच गझल.
त्यामुळे गझलचे उद्दीष्ट कवितेच्या उद्दीष्टाशिवाय वेगळे असणार नाही..

गझल का लिहिली जाते? : कविता ज्या कारणासाठी लिहीली जाते त्याच.. विचारांच्या प्रगटीकरणाचा एक मार्ग .. कुणी गद्य लिहील कुणी पद्य..

स्वान्तसुखाय? की श्रोत्यांच्या सह-अनुभूतीसाठी? : दोन्हीसाठी असु शकेल पण स्वान्तसुखाय लिहीणं महत्वाचं हे माझं मत.

गझल सहजसोपी का असावी? : गझल असच नाही तर कुठल्याही माध्यमातुन विचार प्रगट केले तर ते वाचकाला समजावे असं अपेक्षित असतच ना? म्हणुन..

गझलचा/शायरीचा अर्थ प्रत्येक श्रोत्याला कळलाच पाहिजे का? : तसं आवश्यक नाहीये.. उदा ग्रेसची कविता अनेकांना (मलाही) कळत नाही. याचा अर्थ ती कविता नाही असा कसा काढता येईल.

मी गझल प्रांतात खरोखर नवीन आहे.आणि मला क्लिष्ट लिहायला आवडते म्हणून विचारले. : जरुर लिहावे. तुमच्या काव्याचा गझलेचा वाचकवर्ग / श्रोता हा वेगळा असेल इतकच. वाचकांमधेही काहींना सहज सोपं लिहीलेलं भावतं काहींना क्लिष्ट.

सहमत

मीनुच्या सर्व मुद्द्यांशी १००% सहमत..!