कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
तो जुन्या पत्रांतुनी भेटून गेला
मृगजळांविण राहिला पर्याय नाही
पावसाळा काहिली देऊन गेला
बिलगताना बोचल्याचा भास झाला
भेटला की तो मला टाळून गेला?
धूमकेतूसारखा आला पुन्हा तो
आठवांचे चांदणे उधळून गेला
हासण्याने गवसला होता पुरावा
लाजण्याने फैसला होऊन गेला
रोजचा मारेकरी आला असावा
रोजच्यागत जीवही हुरळून गेला
अस्त केव्हा व्हायचे हे शब्द माझे
काजव्यांचा जन्म कंटाळून गेला
दूर सीमेवर जरा आवाज झाला
लाख कानांना दडे बसवून गेला
हा असा भर भर मला वाचून गेला
तो तसा वर वर मला चाळून गेला
प्रतिसाद
सुंदर
वैभव,
गझल आवडली.
'पुरावा - लाजणे' अप्रतिम.
मक्ता भर भर वाचूनही आवडला!
- कुमार
हेच म्हणतो.
गझल आवडली. त्यातही मक्ता फारच आवडला.
´हासण्याने पुरवला होता पुरावा´ असेही वाचले. इथे 'स्मित' आले असते तर अधिक चांगले झाले असते असे वाटते. कारण 'स्मितहास्य' हे साध्या हसण्यापेक्षा अधिक गहिरी स्वीकारोक्ती असते, असे मला वाटते.
'पुरवले आधी स्मितांनीही पुरावे' असे काहीसे.
उत्तम आहे.
शेरांना प्रतिसाद देऊन झालेले आहेतच.
त्यामुळे नव्याने इतकेच म्हणावेसे वाटते की -
कमजोर शेरांनाही मजबूत शेरांमुळे वजन येते असे लक्षात आले.
माझ्या नावडीचे / न कळलेले गझलेतले २ शेर सोडले तर इतर सर्व (माझ्या आवडीचे/कळलेले )चांगले, उत्तम आणि अत्युत्तम दर्जात मोडतात.
गझल उत्कृष्ट! माझे - ;) / :)
असो. शेरखान स्पर्धेमुळे मजा आली.
उत्तम
जे ताकदीचे वाटले तेच शेर ठेवले आहेत का सर्वच शेर सारख्या ताकदीचे वाटले?)
काही शेर वाचताना एकदम उजवे वाटतात त्याने कमजोर शेराकडे दूर्ल्क्ष न होता अपेक्षा वाढलेल्या पूर्ण होत नाहीत असे जाणवले.
शेरांना दाद दिली आहेच.
धूमकेतूसारखा आला पुन्हा तो
वैभव, गझल सुंदर आहे.
हुंदका साधा तुझा सांगून गेला
तो जुन्या पत्रांतुनी भेटून गेला
वेगळेपणा आवडला.
धूमकेतूसारखा आला पुन्हा तो
आठवांचे चांदणे उधळून गेला
वा वा. धूमकेतू आवडला.
हासण्याने गवसला होता पुरावा
लाजण्याने फैसला होऊन गेला
सुंदर शृंगारिक शेर. खूप आवडला.
दूर सीमेवर जरा आवाज झाला
लाख कानांना दडे बसवून गेला
छानच.
व्वा
मस्त गझल
मृगजळ, बिलगताना, लाजण्याने जास्त आवडले.
सुधीर
सुंदर गझल...
पावसाळा काहिली देऊन गेला
>सपाट शेर
भेटला की तो मला टाळून गेला?
>छान
लाजण्याने फैसला होऊन गेला
>वा सुंदरच !!!
काजव्यांचा जन्म कंटाळून गेला
>छान
लाख कानांना दडे बसवून गेला
>जाणवलेला गर्भितार्थ इतका भावला नाही
तो तसा वर वर मला चाळून गेला
>मक्तयातली कल्पना trite असली तरी रचना एकदम सही ! भर भर - वर वर छान !
>बाकीचे शेर नेहमीचेच...
पुरावा
हासण्याने गवसला होता पुरावा...
एक अत्यंत सुरेख शेर
फार फार आवडला.