३३ : प्रसाद

प्रसाद's picture

हुंदका साधा तुझा सांगून गेला
भास सौख्याचा तुझा संपून गेला

मग्न होतो पूजनामध्ये जयाच्या
तो कितीदा दार ठोठावून गेला...

बाटलीतुन काय साकी ओतले तू?
आज प्यालाही कसा झिंगून गेला?

एवढे होऊनही का हासतो मी?
दर्द माझा वेस ओलांडून गेला!

एक साधा प्रश्न त्याने मांडला अन्
वीण जीवाची पुरी उसवून गेला...

मी उधाणाचाच होतो चंद्र तेंव्हा
ना कळे दर्याच का आटून गेला...

भेटण्या आलीस माझ्या अंगणी तू
अन पहा, प्राजक्तही बहरून गेला!

दर्शनासाठी कुणी दिंडीत आला
तो स्वतःही पालखी उचलून गेला...

प्रतिसाद

चांगली आहे.

शेरांना प्रतिसाद देऊन झालेले आहेतच.
गझल चांगली! माझे - ;) / :)

रसिक's picture

दर्द , जिवाची वीणा

दर्द आणि जिवाची वीणा आवडले.

वीणा नाही वीण...

मॅंचेस्टर, कबीर, भिवंडी... रसिक म्हाराजा, सरसुति न्हवे.मुद्राराक्षसाला सांभाळा...

तो कितीदा दार ठोठावून गेला

मग्न होतो पूजनामध्ये जयाच्या
तो कितीदा दार ठोठावून गेला...
वा. वरच्या दर्जाचा शेर.

भेटण्या आलीस माझ्या अंगणी तू
अन पहा, प्राजक्तही बहरून गेला!
वा. अतिसुंदर. वाचकाच्या अंतरात प्राजक्ताचा सडा शिंपणारा.
सडा असा शिंपलास तू अंतरात माझ्या
पसा पसा मी भरावयाला तयार झालो

सुंदर

छान आहे

मग्न होतो पूजनामध्ये जयाच्या
तो कितीदा दार ठोठावून गेला...

एवढे होऊनही का हासतो मी?
दर्द माझा वेस ओलांडून गेला!

एक साधा प्रश्न त्याने मांडला अन्
वीण जीवाची पुरी उसवून गेला...

हे जास्त आवडले.

सुधीर

अरे

हे रंगीत कसे झाले?

प्रणवचा रंग :)

प्रणव,

तुझी font settings reset करत जा की पोस्टच्या शेवटी. पुढच्या सगळ्या पोस्ट्सना तोच रंग लागतो नाहीतर. :)

ओह..

असे होत होते का :)