कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..

हुंदका साधा तुझा सांगून गेला
शब्द का रे का असा फसवून गेला?
टाळण्याचे रे बहाणे संपलेले
सत्य का तू सांग हेटाळून गेला?
हे खरे की ते खरे का शोधसी तू?
ज्ञात जे तू सत्य नाकारून गेला.
आणलेली उत्तरे तू लगबगीने
प्रश्न माझा तू असा टाळून गेला.
सूर्य तू जो आणला गगनात माझ्या
चंद्रमौळी झोपडी जाळून गेला.
प्रतिसाद
सुंदर झाडा...
टाळण्याचे बहाणे कायम लक्षात राहिल!!
'आणलेली उत्तरे' वाहवा! मस्त कल्पना आणि वास्तव!
पण एक सुचवू... इथे दोन्ही मिसर्यात 'तू' मुळे वेगळाच Effect आला आहे.
त्याने उत्तरे आणली आणि (तरीही) त्यानेच प्रश्न टाळला...थोडेसे Unnatural वाटले.इथे जर का शेराला 'मी'पणाची अनुभूती देता आली असती तर अजुन छान झाला असता असे वाटते.
आणलेली उत्तरे मी लगबगीने
प्रश्न माझा का मला टाळून गेला?
असे काहीतरी...अर्थात संपूर्ण अर्थाचा कायापालट होतोय म्हणा...
तरीही मूळ शेर अस्सल आहेच.
मक्ताही छान.सूर्य-चंद्र ह्या शब्दाचा वापर छान केला आहे.
-आभाळभरून शुभेच्छा :)
-आपले आभाळ :)
आणलेली
आणलेली उत्तरे तू लगबगीने
प्रश्न माझा तू असा टाळून गेला?
वा!!!!!!!!!!!!!
मानलं...........
काय बोललायेस..........
खरच...........अगदि बरोबर आहे.......अगदि मनतल वाटल........
आणलेली
आणलेली उत्तरे तू...
आह!!!
मुकर्रर!!
टाळण्याचे रे बहाणे... हाय!! वाहवाह...
शुभेच्छा...
वा!
'आणलेली उत्तरे' खासच. पण...
३ शेरांच्या सानी मिसर्यांत 'तू' आले आहे. त्यामुळे 'गेला' खटकले. 'तू ' म्हटले की 'गेला(स)' असे होते ना...
- नचिकेत आठवले
सहमत
मलाही 'आणलेली उत्तरे' आवडली.
बाकी हा '(स)' बरेचदा गाळलेला दिसतो हल्ली. त्यामुळे माझाच आग्रह अनाठायी आहे की काय असं वाटायला लागलं होतं मला.
चांगली आहे
कल्पना चांगल्या आहेत.
तू (=स) हे पाळ्ले असते तर बरे झाले असते.
पण गझल चांगली आहे.
माझे - ६/१०.
छान
उत्तरे आणि सूर्य मस्तच!
मतला -दोन "का" टाळता येऊ शकतील.
सत्य - "हेटाळून" एक शब्द वापरला आहे की "हे टाळून" असे दोन शब्द वापरले आहेत? अर्थ वेगळा-वेगळा लागू शकतो त्यामुळे..
नाकारून - उला मिसरा फार सहज आला आहे. सानी मिसरा जरा आणखी प्रवाही करता आला असता.
"तू" बद्दल वर इतर प्रतिक्रियांमधे आलेच आहे. सर्व "तू" च्या ठिकाणी "तो" वापरता येईल.. थोडेसे फेरफार करून.
-- पुलस्ति.
शब्द का रे का असा फसवून गेला?
वसंत ऋतूत झाड चांगलेच बहरले आहे :-)
हुंदका साधा तुझा सांगून गेला
शब्द का रे का असा फसवून गेला?
मतला सर्वाधिक आवडला.
तू गेला..
तू गेला.. गेलास?
सगळे शेरात जे म्हणायचं आहे ते अगदी सुंदर आहे पण पुन्हा काम केलं तर एकदम ओतीव जसेच्या तसे पोचतील ना?
चू भू द्या घ्या
मक्त्यातला सानी मिसरा व्वा! सुंदर!
सर्वनामांचा वापर जास्त झालाय ना?
पुलस्ति हेटाळून.. हे टाळून व्वा!
प्रतिसादा
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
तू - गेला(स) हे पटलं.
काही बदल केलेत , कसे वाटतात ते सांगा :
टाळण्याचे संपता सारे बहाणे
हासला तो पण तरी लांबून गेला.
हे खरे की ते खरे हे शोधतांना
ज्ञात जे तो सत्य नाकारून गेला.
आणलेली उत्तरे ती लगबगीने
प्रश्न माझा तो असा टाळून गेला.
(आभाळ, आता 'तू' गेल्यावर कसं वाटतंय?)
पुलस्ति,
मतल्यामध्ये का दोनदा आल्याने भावनेची तीव्रता वाढली आहे असं मला वाटतं.
हेटाळून असंच अपेक्षित होतं . दोन्ही चालू शकतं, गझल वाचन करताना असे दोन्ही अर्थ लागू शकतात.
मेघधारा, सर्वनामांचा वापर खरंच जास्त झालाय.
तुमच्या सूचनांचा मी खरंच खूप आभारी आहे!
मस्त वाटतंय रे..
'आणलेली उत्तरे'छान झाला आहे.
अरे पण तो 'टाळण्याचे बहाणे' का बदललास?? सानी मिसरा आधीचाच जास्त चांगला होता. म्हणजे मला अर्थ प्रचंड भिडला होता म्हणून तसे वाटत असेल कदाचित.
-आपले आभाळ :)