कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..

हुंदका साधा तुझा सांगून गेला
श्वास माझा का असा फसवून गेला
गार वारा त्या किनारी सोबतीला
दूर जाता गंध तो पसरून गेला
धीट होता हुंदका तो दाटलेला
प्रीत माझी शेवटी वदवून गेला
ना सुचावी ओळ भिडणारी मनाला
हुंदका तो ओळ ती होऊन गेला
वाट होती ओळखीची जीवनाची
काळ माझा का मला निजवून गेला?
बंद झाली वाट आता परतणारी
काळ ही तेंव्हा जणू गोठून गेला
प्रतिसाद
आवडली
आवडली. हुंदक्याचे वेगवेगळे शेर हे ह्या गझलेचे वैशिष्ट्य वाटले.
सहमत आहे.
गझल आवडली.
- नचिकेत आठवले
छान आहे
गझल आवडली.
धीट होता
धीट होता हुंदका तो दाटलेला
प्रीत माझी शेवटी वदवून गेला
हा शेर खूप आवडला!
ठीक आहे.
ना सुचावी ओळ भिडणारी मनाला
हुंदका तो ओळ ती होऊन गेला
धीट होता हुंदका तो दाटलेला
प्रीत माझी शेवटी वदवून गेला
हे चांगले.
बाकी ठिकठाक. गझल ठीक.
माझे - ५/१०.
आनंदपंत
पहिले कडवे कळलेच नाही .
दुस-याचे तेच .
तिसरे कडवे
>>> बरं बरं
चौथे कडवे
>>>छान
पाचवे कडवे
>>> अवघड आहे . काय संबंध ? समजले नाही .
सहावे कडवे
>>> बरं बरं
१, ३, ५ समजावून सांगाल का? मी ढ आहे.
धन्यवाद
मित्रांनो ,
आणि विसुनाना ५ गुण दिलेत ( आमच्याकडे ४० ला म्हणजे ४ ला पास असते ),
ही माझी पहिलीच गझल होती धन्यवाद...
धीट
धीट प्रीत आणि ओळ हे शेर आवडले. लिहित राहा!!
-- पुलस्ति.
सहमत
पुलस्तिंशी सहमत...
लिहिता रहा नितांत...
आभाळभर शुभेच्छा :)
-आपले आभाळ :)