कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
भावनांचा बांध तो फोडून गेला
अंतरीचा ग्रीष्म इतका तप्त होता
चांदण्यांचा स्पर्शही जाळून गेला
आसवांचे पावसाळे, नित्य झाले
मेघ काळा काळजा व्यापून गेला
कवडसा छोटा परी माझ्या नभाला
सप्तरंगी झुंबरे टांगून गेला
बोलणे झालेच नाही पण अबोला
आपल्यामधला दुवा सांधून गेला
मी यशाची सर्व शिखरे चढत असता
पाय खाली सोयरा खेचून गेला
ढोंग मी केले सुखाचे तुज समोरी
चेहरा माझा मला फ़सवून गेला
मानली ना हार श्वासांनी कधी पण;
श्वास मॄत्यूचा मला हरवून गेला
प्रतिसाद
वा!
मतला, मेघ, सोयरा आणि ढोंग - चांगले आहेत.. पण कदाचित आता इतक्या तरही गझला वाचल्यावर जरा जुने वाटतात.
श्वास - कळत नाहिये पण कळला की खूप आवडेल अशी खात्री वाटते आहे :)
पण ग्रीष्म, कवडसा आणि अबोला - हे शेर मस्तच आहेत! खूप आवडले.. "आपल्यामधला दुवा सांधून गेला" वा, फारच सहज मिसरा आला आहे!!
-- पुलस्ति.
आपल्यामधला दुवा सांधून गेला
सुंदर आणि प्रवाही गझल.
बोलणे झालेच नाही पण अबोला
आपल्यामधला दुवा सांधून गेला
हा शेर सर्वाधिक आवडला. फोडून आणि फसवूनही आवडले.
सहमत आहे.
प्रवाही गझल. मस्त आहे, मिल्या.
- नचिकेत आठवले
सहमत
पुलस्तिंशी सहमत... 'कवडश्याने टांगलेली झुंबरे' मला सर्वात जास्त आवडला.
-आपले आभाळ :)
मस्त
मिल्या
छान आहे ही गझल, बोलणे आणि ढोंग आवडले.
सुधीर
कवडसा
कवडसा अप्रतिम!
बोलणे नाहीच.. मधे दुवा आणि सांधून ही द्विरुक्ती वाटत नाहिये का? शिवाय आपल्या मधला..? मला नक्की काय ते सांगता येत नाहिये पण ..
बोलणे झालेच नाही लागलाला
पण अबोलाही दुवा सांधून गेला.
तुझा शेर अंडरएस्टीमेट करायचा प्रयत्न नाही पण खूप सुंदर शेर आहे रे म्हणून.
चू भू द्या घ्या
ढोंग केले.. मधे सानी मिसर्यात .. कसा फसवून गेला हा अपेक्षीत प्रश्न अनुत्तरीत रहातो.
आसवांचे पावसाळे .. वाचल्यावर, कवडसे.. शेर, मेघ काळा.. ला कनेक्टेड तर होत नाही ना? मिलींद, जाणकार?म्हणजे शेरांच्या क्रमाबद्दल अजून कळेल (मला.. :)
चांगली आहे.
कवडसा छोटा परी माझ्या नभाला
सप्तरंगी झुंबरे टांगून गेला
चांगला नवा शेर.
ग्रीष्म, चांदणे, पावसाळा, मेघ जुने.
मतला तितकासा जमला नाही.
शेर चांगले.
गझल चांगली.
माझे - ६/१०.
सुंदर!
-प्रवाही आहे ही गझल.
'अंतरीचा ग्रीष्म' आवडला.
'झुंबर' तर अप्रतिम आलंय.
'यशाची शिखरे' चा शेर मला वाटलं की इथे नसता तर बरं, कारण तो एकच शेर इतरांवर टीका करणारा आला आहे. या गझलचा तसा स्वभाव नाही ना, म्हणून. प्लीज डोण्ट माईंड.
सतीश