२२ : आनंदयात्री

आनंदयात्री's picture

हुंदका साधा तुझा सांगून गेला
टाळले तू, मात्र तो बोलून गेला

दाटले आभाळ जे तव पापणीला
कोरलेले भाळ ते दावून गेला

पार होता कूस संगे गाव माझा
लक्तरे वेशीवरी टांगून गेला

भय अखेरी संपले कैसे म्हणावे?
बाहुला काळा घरा रांगून गेला

घसरलो तेव्हा कुठे मज भान होते?
संचिताचा दीप तेजाळून गेला

बोलते झालोच ना? मग पाहताना
दाह का नजरेतला जाळून गेला?

प्रतिसाद

मात्र तो बोलून गेला

हुंदका साधा तुझा सांगून गेला
मात्र तो बोलून गेला
आवडले. शेवटच्या शेरातला ओघ आवडला.

छान्

आभाळ शेर ठीक. लक्तरे आणि बाहुला - नीट कळले नाही. शेवटचे २ शेर आवडले. पण मतला सर्वात जास्त आवडला... खासच आलाय!
-- पुलस्ति.

नचिकेत's picture

मतला...

आणि शेवटचा शेर आवडले, नचिकेता...

पण बाकीचे शेर जरा जड जात आहेत. पुन्हा वाचून बघतो. :-)

- नचिकेत आठवले

ठीक आहे.

बोलते झालोच ना? मग पाहताना
दाह का नजरेतला जाळून गेला?

चांगला शेर आहे.

दाटले आभाळ जे तव पापणीला
कोरलेले भाळ ते दावून गेला

पार होता कूस संगे गाव माझा
लक्तरे वेशीवरी टांगून गेला

कल्पना चांगल्या.
गझल ठीक आहे.
माझे - ५/१०.

सहजतेला बाधा...कसरत वाटते काही ठिकाणी..

मतला आणी मक्ता आवडले.
बाकी शेरांवर पुन्हा विचार करायला हवा होता.
चु.भू.दे.घे.
-आपले आभाळ :)

आनंदयात्री's picture

सर्वांना

सर्वांना धन्यवाद!!
तुमच्या सर्व मतांशी एकदम सहमत...
नीट नाही जमली ही गझल...
अर्थात, अगदीच सो-सो नाहिए... पण i also wasnt totally satisfied...

मतला व्वा!

मतला व्वा! अगदी सहज संवाद साधणारा.
दाटले आभाळ जे... मला जे कळलं तेच म्हणायचं होतं का? असं वाटलं. म्हणजे तुझे आसू माझ्या नशिबात काय लिहिलय ते सांगून गेले .. असं म्हणायचं होतं का?
२,३,४ कळले नाहीत पुन्हा वाचते आहे.