रदीफ अनिवार्य आहे का?

हरेक आवाज आज अर्ध्यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला
अरे कुणी चोरला उद्याचा पहाटतारा
उजेड येई दिव्यादिव्यातून बाटलेला
या गझलेत 'ऊ' अलामत असेल तर रदीफ आणि काफिया कोणता आहे?
माझा थोडा गोंधळ होतो आहे. सांगाल का?
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
अनिवार्य नाही
विसुनाना
गझलेमधे रदीफ अनिवार्य नसतो. रदीफ नसलेल्या (फक्त काफिया असलेल्या) गझलांना गैर मुरद्दफ गझल असं म्हणतात... अनेक जेष्ठ गझलकारांनी या प्रकारच्या गझल लिहिल्या आहेत. तुम्ही वर दिलेलं उदाहरण हे अशाच गझलेचं आहे. म्हणजे या मध्ये छाटलेला, फाटलेला, बाटलेला इ कवाफी आहेत व गझलेला रदीफ नाही.
धन्यवाद
महत्वाच्या माहितीबद्दल अनेक धन्यवाद!