कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
पापण्यांचा बांध मग वाहून गेला
बोलण्यासाठी हवे का शब्द, जेव्हा
सर्वकाही स्पर्श ओलांडून गेला
श्वास हा माझा तसा होता इमानी
शेवटी तो ही मला सोडून गेला
घाव ज्याने खोल हा होता दिलेला
तो मला का आपला वाटून गेला
बदलले संदर्भ शब्दानी असे की
अर्थ साधा-भाबडा बाटून गेला
मी कसे आता स्वतःला ओळखावे
मुखवटा माझा कुठे हरवून गेला
शेवटी समजूत माझी काढली मी
कारडा प्रत्येक जण भेटून गेला
आरशाला सांग का "विश्वास" व्हावा?
चेहरा माझाच मज फसवून गेला
प्रतिसाद
जियो.... जबरद
जियो....
जबरदस्त गझल..
घाव ज्याने खोल हा होता दिलेला
तो मला का आपला वाटून गेला
बदलले संदर्भ शब्दानी असे की
अर्थ साधा-भाबडा बाटून गेला
मी कसे आता स्वतःला ओळखावे
मुखवटा माझा कुठे हरवून गेला
हे तीन कातिल आहेत... (मतला मात्र यामुळे काहिसा "वरणभात" वाटतो.. राग मानू नका हं!!)
सहमत...
आनंदयात्रीने उल्लेखलेले शेर कातिल...
मतला मात्र... त्याचं काय आम्हाला कोल्हापुरी तिखटपणाचं 'व्यसन' भयंकर आहे ना..म्हणून असेल कदाचित...
पण मस्त आहे गझल एकंदरीत.
लिहित रहा असेच जिंदाबाद :)
-आभाळा :)
वा !
बदलले संदर्भ शब्दानी असे की
अर्थ साधा-भाबडा बाटून गेला
मी कसे आता स्वतःला ओळखावे
मुखवटा माझा कुठे हरवून गेला
आवडले . दुस-या शेरात नेहेमीची कल्पना असली तरीही दोन्ही मिस-यांना ओघ छान आहे .
श्वास हा माझा तसा होता इमानी
शेवटी तो ही मला सोडून गेला
इथे "तसा" चे प्रयोजन समजले नाही . इमानी असूनही सोडून जाणार असेल तर असा "कसा" इमानी असा प्रश्न पडायला हवा ना?
सहमत आहे
'बदलले संदर्भ' आणि मक्ता आवडला.
श्वासाच्या शेराबद्दल वैभवशी सहमत. उला मिसर्यात उपरोधही छान वाटला असत असे वाटते. म्हणजे "श्वास हा माझा म्हणे होता इमानी" असे काहीसे.
बाकी, गझल छान आहे. पु.ले.शु.
- नचिकेत आठवले
चांगली आहे.
आनंदयात्रींनी उल्लेख केलेले शेर चांगले आहेत.
संदर्भ - अर्थ -बाटून जाणे हा सर्वोत्कृष्ट शेर!
बाकीचे ठीक.
'मी'ची मुसलसल गझल लिहिण्याचा स्तुत्य प्रयत्न.
गझल चांगली आहे.
माझे- ६/१०.
अर्थ साधा-भाबडा बाटून गेला
सर्वकाही स्पर्श ओलांडून गेला
श्वास हा माझा तसा होता इमानी
शेवटी तोही मला सोडून गेला
मी कसे आता स्वतःला ओळखावे
मुखवटा माझा कुठे हरवून गेला
आवडले.
बदलले संदर्भ शब्दांनी असे की
अर्थ साधा-भाबडा बाटून गेला
सर्वाधिक आवडले.
आरशाला सांग का "विश्वास" व्हावा?
चेहरा माझाच मज फसवून गेला
विश्वास हा शब्द छान आला आहे.
छान आहे गझल
बदलले संदर्भ शब्दानी असे की
अर्थ साधा-भाबडा बाटून गेला
आरशाला सांग का "विश्वास" व्हावा?
चेहरा माझाच मज फसवून गेला
हे शेर जास्त आवडले
सुधीर
सहजभाव पण खोल अर्थ
विश्वास
सहजभाव आहे गजलेत पण अर्थवाही आहे. (वैभवच्या भाषेत - काही काही शेर समोर बसून बोलल्यासारखे सहज आहेत).
श्वास माझा, अर्थ साधा-भाबडा अप्रतिम शेर.
-- शलाका