कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा, सांगून गेला
रातच्याला चांद तो भांडून गेला
कोमलांगी लाज उघडी, परसदारी
भोग कसला डाव हा, मांडून गेला
प्रेत एकच, देशप्रेमी नाव होते
घाट रडला, गाव मग पांगून गेला
ध्येयवादी जीव, भिक्षापात्र हाती
काळ वेशीला जिणे टांगून गेला
मोहमाया दागिने जर व्यर्थ झाले
वेळ झाली, प्राण का थांबून गेला..
प्रतिसाद
रातच्याला चांद तो भांडून गेला
रातच्याला चांद तो भांडून गेला
भांडण आवडले :-)
चांद..
मतला मस्तच चिन्नु! प्राण शेरही आवडला. ध्येयवादी - उला मिसरा छानच, पण सानी अजून स्पष्ट आला असता. भोग शेरामध्ये "," ची गरज नाहिये. २, ३ शेर मला नीट कळलेत असे वाटत नाही. पुन्हा वाचीन..
-- पुलस्ति.
चांद भांडला...
Great!!!
चिन्नू...मतला लयी भारी!
चंद्राचे भांडण आवडले.आणि 'रातच्याला' असे म्हटल्याने एक वेगळाच बाज आलाय मतल्यात.
दुसरा समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय...
४ था आणि मक्ता सुंदरच आहेत.
ध्येयवादी जीव,भिक्षापात्र हाती... Tragedy मस्त प्रकट झाली आहे.
मक्ता ..मक्त्यासारखाच छान... उला मिसर्यातून निर्विकारपणा प्रकट झाला आहे आणि सानी मिसर्यातून
'वेळ झाली तरी प्राण थांबणे' ही जीवनाची अनादी अनंत ओढ ,आंतरीक उर्मी सहज पणे प्रकट झाली आहे!!
सुंदर गझल. :)
पु.ले.शु.
- आपले आभाळ :)
ठीक आहे.
प्रेत एकच, देशप्रेमी नाव होते
घाट रडला, गाव मग पांगून गेला
ध्येयवादी जीव, भिक्षापात्र हाती
काळ वेशीला जिणे टांगून गेला
कल्पना चांगल्या.
प्रेत एकच - गालगाल?
कोमलांगी?
गझल ठीक आहे.
माझे -५/१०.
प्रेत एकच
प्रे त ए कच
गा ल गा गा
असेच आहे नाना..
-- पुलस्ति.
बरोबर
माझेच वाचताना चुकले असावे. क्षमस्व!
धन्यवाद
सर्वांचे मनापासून आभार.
ध्येयवादीचा उला मिसरा स्वाती ताईने सुचविला आहे. माझी ओळ होती, "भीक मागी ध्येयवादी जीव का ते?"
पण लोखंडाला परिसस्पर्श व्हावा तशी माझीही गझल स्वातीताईमुळे जिवंत झाली आहे!
स्वत:च्या च गझलेसारखी, ह्या गझलेला आपली मानून त्यातल्या तांत्रिक त्रुटी सोशिकपणे दर्शवून दिल्याबद्दल, सारंग यांचे मनापासून आभार.
माझ्यासारख्या ट ला ट लावणार्या एका अतिसामन्य मुलीला, कविता म्हणजे काय ते गझल कशी असावी ते गझल कशी लिहावी, हा प्रवास बोट धरून करविणार्या वैभव गुरुजींना सदैव धन्यवाद.
अशी एक चर्चा इथे घडावी आणि सर्वांन्ना व्यासपीठ मिळावे, या साठी प्रसाद यांनी घेतलेले श्रम वाखाणण्याजोगे आहेत.
मी आपले बोबडे बोल लिहावे आणि आपण सर्व ते गोड मानून घेत आहात , तेव्हा प्रतिक्रिया देणार्या सर्व संवेदनशील दिग्गज्जांना चिन्नुचा प्रणाम!
आ. चिन्नु
वा!
वा चिन्नू,
ध्येयवादी जीव, भिक्षापात्र हाती
काळ वेशीला जिणे टांगून गेला
--- बढिया शेर! मक्ताही आवडला.
शेर २,३ अर्थ नक्की समजले नाही.
चातक