कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..

हुंदका साधा तुझा सांगून गेला!
चेहरा हास्यात जे लपवून गेला
हुंदका साधा तुझा सांगून गेला
वचन मौनाचे मला मागून गेला!
खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
ऐकताना (/सांगताना) तो पुन्हा रंगून गेला!
मीलनाची शक्यता नव्हती, तरीही
चंद्र सारी रात्र का जागून गेला?
दूरवर होते सुखाचे चांदणे; पण-
एक त्याचा कवडसा बिलगून गेला...
जीवनाची शाश्वती मागू कुणाला?
मेघसुद्धा कोरडे वागून गेला!
प्रतिसाद
कुमार.... मस्तच रे !
मिलनाची शक्यता... अप्रतिम !
दूरवर होते... खूप आवडला !
मेघसुद्धा.. मक्ता सुन्दरच !
गजल आवडली रे कुमार !
छान!
मौन आणि मेघ विशेष आवडले!
-- पुलस्ति.
मलाही....
कुमार,
मस्त आहे गझल. मौन आणि मेघ हे शेर खूप आवडले.
- नचिकेत आठवले
अतिशय
अतिशय सुंदर गझल. खूप आवडली.
हुंदका साधा तुझा सांगून गेला!
चेहरा हास्यात जे लपवून गेला
हुंदका साधा तुझा सांगून गेला
वचन मौनाचे मला मागून गेला!
सुंदर दोन्ही मतले आवडले. दुसर्या ओळींमधला 'गेला' हा शब्द दुसर्या मतल्यात जास्त चपखल वाटला.
खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
ऐकताना (/सांगताना) तो पुन्हा रंगून गेला!
अगदी. असे होते बरेचदा. आवडला.
मीलनाची शक्यता नव्हती, तरीही
चंद्र सारी रात्र का जागून गेला?
व्यक्तिगत निरोप करायचा आहे, तुमचा पत्ता कळवाल का? माझा pranav.kale@gmail.com
दूरवर होते सुखाचे चांदणे; पण-
एक त्याचा कवडसा बिलगून गेला...
सुंदर. आवडला.
जीवनाची शाश्वती मागू कुणाला?
मेघसुद्धा कोरडे वागून गेला!
वा. दुसरी ओळ खूप आवडली. 'जीवनाची'चा श्लेष आवडला. शाश्वतीहून वेगळा शब्द वापरता येईल का?
अतिशय सुंदर गझल.
चंद्र मीलन,चांदणे कवडसे...आहाहा!!!वा!!
शेवटचे तिन्ही शेर खूप आवडले...
खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
ऐकताना (/सांगताना) तो पुन्हा रंगून गेला!
इथे 'एकणे कि सांगणे कि दोन्ही' हे वाचकावर सोपवले आहे काय जाणूनबुजून ???
गझल सुंदर आहे...
--आभाळ :)
सुंदर.
-कुमार,
हुंदका साधा तुझा सांगून गेला!
चेहरा हास्यात जे लपवून गेला
हा मतला मला स्वत:ला या कार्यशाळेत आतापर्यंतचा सर्वात चांगला मतला वाटला.
दूरवर होते सुखाचे चांदणे; पण-
एक त्याचा कवडसा बिलगून गेला...
हा शेरही आवडला.
छानच लिहिलं आहे तुम्ही.
-सतीश
अप्रतिम मतला.
हुंदका साधा तुझा सांगून गेला
चेहरा हास्यात जे लपवून गेला
हा मतला सतीशने म्हटल्याप्रमाणे खरोखरच अर्थवाही आणि अक्रुत्रिम झाला आहे.बाकी गझल छानच आहे.
व्वा
छानच आहे.
सतीशना अनुमोदन
हुंदका साधा तुझा सांगून गेला!
चेहरा हास्यात जे लपवून गेला
मतला आवडला
कवडसा आणि मेघही छान आहेत..
सुधीर
ठीक आहे
हुंदका साधा तुझा सांगून गेला!
चेहरा हास्यात जे लपवून गेला
खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
ऐकताना (/सांगताना) तो पुन्हा रंगून गेला!
हे ठीक.
जीवनाची शाश्वती मागू कुणाला?
मेघसुद्धा कोरडे वागून गेला!
यातल्या मिसर्यांचा संबंध स्पष्ट केला तर बरे होईल.
(पाण्याची / जगण्याची शाश्वती - मेघाचे / मित्राचे वागणे- पण शाश्वती कशी?)
कुमारसाहेब, याहून चांगल्या गजलेची अपेक्षा होती. असो.
माझे - ५/१०.
कवडसा
दूरवर होते सुखाचे चांदणे; पण-
एक त्याचा कवडसा बिलगून गेला...
मस्त!
सहमत
गझल मस्तच
खूप वेळा
खूप वेळा ऐकलेली ती कहाणी
ऐकताना (/सांगताना) तो पुन्हा रंगून गेला!
वाव्वा! मस्तच. गझल फार आवडली.