कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
डंखप्रश्न
हुंदका साधा तुझा सांगून गेला
उंबर्याचे माप का सांडून गेला?
हुंदका साधा तुझा सांगून गेला
का - रणी मज एकटे सोडून गेला?
साठलेला गाळ - काळा - काळडोही
का असा मग भोवरा ढवळून गेला?
सांजवेळी का घुमावा कुकुडकुम्भा?
-शून्य पिवळी शांतता भंगून गेला
(ही नवी कावीळ त्याला बाधलेली)
पण 'मनाचा' रंग का बदलून गेला?
लाल शाई धावते धमन्यांत त्याच्या
का कवी उपराच तो राहून गेला?
'मी' पणाचा नाग बा आला कधी रे?
(आणि जहरी डंखही मारून गेला)
अन्'विसू'च्या लेखणीने या गजाली
अंतरीचा 'तो' कसा लिहवून गेला?
प्रतिसाद
(ही नवी कावीळ त्याला बाधलेली)
(ही नवी कावीळ त्याला बाधलेली)
पण 'मनाचा' रंग का बदलून गेला?
वेगळेपणा आवडला.
चांगली आहे....
वा!!! विसुनाना,
छान जमून आली आहे गझल. 'साठलेला गाळ', 'कावीळ' आणि मक्ता विशेष.
- नचिकेत आठवले
वा
विसूनाना
साठलेला गाळ आणि लाल शाई विशेष आवडले
छान आहे
(ही नवी कावीळ त्याला बाधलेली)
पण 'मनाचा' रंग का बदलून गेला?
'मी' पणाचा नाग बा आला कधी रे?
(आणि जहरी डंखही मारून गेला)
हे शेर आवडले
सुधीर
चांगली आहे.
तिसर्या शेरापासून सूर लागतो.पण दोन्ही मतले भुईसपाट आहेत.
उंबर्याचे माप-उल्या मिसर्याशी काय संबंध आहे?
त्या ऐवजी- प्रश्न मम का पायरी सोडून गेला...असे काही लिहिता आले असते.
दुसरा मतला फुकट गेला आहे. पुन्हा लिहा. नवी कल्पना वापरा.
कुकुडकुम्भा हा पक्षी सामान्यपणे माहित नसू शकतो. त्याऐवजी-
सांजवेळी का घुमावे पारव्याने ... हे साधे, सोपे संकेतास धरून झाले असते.
कल्पना तुमची आहे.
बाकीचे शेर चांगले आहेत. मक्ता ठीक. अजून सहजता आली तर उत्तम.
माझे - ७/१०. लिहित रहा.
कावीळ्
कावीळ झालेला शेर आवडला.
वा!
विसुनाना - कावीळ, डंख आणि "मक्ता" आवडला!!
-- पुलस्ति.