कैफ्

Dhiraj Navlakhe's picture

काय नाते सावलिशी,सोयरे कोठे फुलाशी
जन्मलो तेव्हा उन्हाने,लावले होते उराशी

जा दिली मी संमती, तू काळजाला दे दुरावा
आसवेही देवुनी जा, लोचनासाठी ज्रराशी

लाल नाही वा गुलाबी, केशरी काळा निळाही
मी कशाला रंग फासू, झूठ ना मी जीवनाशी

चेहर्याचा भंगलेला, आरसा लावू कुठे मी
आज बेईमान भिती,काळजाच्या या घराशी

फुल तू गंधाळणारे,भृग झाले ओठ माझे
कैफ हा आला कुठुनी, काय प्यालो मी मघाशी ?

जिकणे माझेच होते, हारही माझीच आहे
तू अशी व्याकूळ का?, मी खेळतो या प्राक्तनाशी

----धीरज 9595943214