कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
साथ आपुली संपली कळवून गेला
काय द्यावी आज या मेघास शिक्षा
चांद माझा तेवढा मळभून गेला
एकटीने पिंजले मी रान सारे
शाम केव्हाचा सये परतून गेला
कोण कोणा ओळखे येथे खुळ्या रे?
स्वार्थ जो तो आपला साधून गेला
हाय दैवा! काय मागू दान आता?
'येत नाही!' काळही सागूंन गेला
वेदनांचा काय देऊ मी पुरावा
सोसणेही तो मला शिकवून गेला
घ्यायचे ते घेऊनी गेलात सारे
जोश लढण्याचा उरी राहून गेला
प्रतिसाद
हुंदका
हुंदका साधा तुझा सांगून गेला
साथ _अ_पुली संपली कळवून गेला
आवडले.
काय द्यावी आज या मेघास शिक्षा
चांद माझा तेवढा मळभून गेला
वा. मळभून छानच. असे नामधातू बोलीभाषेत यायला हवेत. स्वतः 'मेघधारे'नेच मेघाचा सुंदर शेर दिला :-)
तुमचे मेघधारा हे नावही सुंदर आहे. हे नाव गुंफलेला मक्ता वाचायला आवडेल.
छान गझल
प्रणवना अनूमोदन. पहीले दोन्ही शेर आवडले.
वा! मेघा ...सुंदर गझल
मतला सहज सुंदर आला आहे.
तिथे 'साथ अपुली' असे हवेय.
सर्वात अप्रतिम असलेला शेर म्हणजे
काय द्यावी आज या मेघास शिक्षा
चांद माझा तेवढा मळभून गेला.
'चांद मळभून जाणे' लाजवाब!!
एकटीने पिंजलेले रानही चांगला आहे.
मक्ता ठिक. बाकीचे जुने.
-आपले आभाळ :)
वाहवा!!
सुंदर आहे गझल, मेघा.
पहिले दोन शेर खासच.
पु.ले.शु.
- नचिकेत आठवले
अप्रतिम
अप्रतिम गझल!!
कोण कोणा ओळखे.. - अगदी सहज आलेला शेर, तरीही वास्तववादी..
हाय दैवा!--- वा!
वेदनांचा.. - सुंदर!!
ठीक आहे.
काय द्यावी आज या मेघास शिक्षा
चांद माझा तेवढा मळभून गेला
घ्यायचे ते घेऊनी गेलात सारे
जोश लढण्याचा उरी राहून गेला
चांगले आहेत.
बाकी ठिकठाक. गझल ठीक आहे.
माझे-५/१०
वा
वा विसूनाना पास केलत तर!
सगळ्यांची आभारी आहे.
प्रणव विचार करेन.
मेघधाराजी
पहिले कडवे
>>> बरें.
दुसरे कडवे
>>> तेवढा की केवढा?
तिसरे कडवे
>>>समजलेच नाही.
चौथे कडवे
>>>ठीक ठीक. पण समजले.
पाचवे कडवे
>>>अवघड आहे. काळाकडे दान मागायचे होते का? दान देणारा घरी आल्यावर दान मागितले जाते का? समजले नाही.
सहावे कडवे
>>>बरें बरें
सातवे कडवे
>>>जोश राहून गेला ह्याचा विषाद आहें की काय? येथे तरी तसेच आल्यासारखे वाटले .
२,३,५,७ समजावून सांगा . मी ढ आहे.
आवडली
चांद माझा तेवढा ! वा हा शेर आवडला.
छान!
मळभून आणि जोश - मस्तच! स्वार्थ आणि वेदना हे शेरही आवडले.
रान - 'सये' भरीचा वाटतोय. काळ - सानी मिसरा आवडला. पण उला मिसरा जरा अधिक स्पष्ट होऊ शकला असता. "हाय दैवा!" असे उद्गारवाचक म्हटल्याने मग पुढे दान कुणाकडे मागितले जातेय हे धूसर राहतेय.
-- पुलस्ति.
मस्त!
मस्त गजल मेघधारा! सर्व शेर आवडले. पहिले २ जास्त आवडले.
२, ५, ६ जास्तं आवडले
मेघधारा
छानय! २, ५, ६ शेर जास्त आवडले