स्त्री गर्भ हत्तेची दुकाने

yogesh.tanmane's picture

उदरातील स्पंदने आता जानवु लागली
गोड उद्याची स्वप्ने माता सजवु लागली
उदरी कन्या असे कळले जसे पित्याला
पेटलेली सारे निखारे ती विझवु लागली

उद्याच्या युगाची तुच ऊन अन् सावली
भविष्यातल्या जगाची तुच माता अन् माऊली
कळतयं सारं काही सगळ्यानांच पण तरीही
आज स्त्री गर्भ हत्तेची दुकाने इथे लागली

विसर पडलाय का सा-यानां?
तिला फक्त प्रेम देता आणि घेता येतं
रात्रभर रडणा-या पिलांसाठी रात्रभर जागता येतं
आई आपली कधीतरी मुलगीच होती
ती आपल्याशी कधी नाही परक्यासारखी वागली
मग तिलाच संपवण्यासाठी आपण दुकाने का लावली

तुटपुंज्या स्वार्थापायी आपण वैद्यांनी
इमाने आपली विकली
भविष्य विचारेल आपल्याला नक्की
रक्षाबंधनासाठी मला एक बहीन पण नाही ठेवली

जगाचा विधाता तु, अशीच तत्व आजवर सा-यांनी मांडली
सांग खरचं मग तु आता
ही अमिषाची दुकाने का मांडली