१४ : रविहिरो

हुंदका साधा तुझा सांगून गेला
आसवान्चा डोह का आटून गेला

सप्तरन्गी स्वप्न दिधले तू जयाला
पापण्यान्ची रात तो उसवून गेला

तू निखारे पार केले लीलया अन्
तो उगाचच तोल साम्भाळून गेला

वार होता ! - तो जरी हळुवार होता
पाहिले तू ज्यास, कामातून गेला

वाल्मिकी वा व्यास ज्याला लाभला तो
आपणाला देवपण देऊन गेला

सर्व गेले शेवटी, पण, प्राण माझा
राहिला - जो वाटले, सम्पून गेला

प्रतिसाद

आवडली

गझल आवडली. कल्पना सगळ्या छान आहेत.

तोल

तू निखारे पार केले लीलया अन्
तो उगाचच तोल साम्भाळून गेला

हा शेर आवडला...
गझलेचा तोल अजुन चांगला सांभाळता आला असता...
पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा :)
-आभाळ

नचिकेत's picture

छान..

शेरातल्या कल्पना चांगल्या आहेत. 'तोल' मस्तच. 'वार होता' ही नेहमीचीच कल्पना वेगळ्या tone मधे छान उतरली आहे.

पु.ले.शु.
- नचिकेत आठवले

बरी आहे.

कल्पना ठीक. पण मिसर्‍यांची सुसंगती लागत नाही.

तू निखारे पार केले लीलया अन्
तो उगाचच तोल साम्भाळून गेला

वार होता ! - तो जरी हळुवार होता
पाहिले तू ज्यास, कामातून गेला
हे ठीक आहेत.

सप्तरन्गी स्वप्न ,आसवान्चा डोह ,पापण्यान्ची रात -काव्य आहे.
पण पुन्हा लिहिली असती तर बरे झाले असते.

माझे-४/१०.

कल्पना

निखारे, पापण्या आणि देवपण - या कल्पना छानच आहेत!
पु.ले.शु.!!
-- पुलस्ति.

तोल

तोल सांभाळून गेला मस्तच . बाकी काही सुटे सुटे मिसरे छान आले आहेत

उदा:- वार होता ! तो जरी हळुवार होता .