१२ : सोनाली जोशी

सोनाली जोशी's picture

हुंदका साधा तुझा सांगून गेला
आसवांचा ओघही संपून गेला

द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला!

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!

का पहावी वाट फुलण्याची कळीने?
भृंग इच्छेने कुठे येऊन गेला?

" आज नाही", एवढेसे ती म्हणाली
तो नकाराने किती पोळून गेला !

भेटले मज लोक सारे टाळणारे ...
खेद हा की काळही सोडून गेला

प्रतिसाद

संवेदनशील

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!

" आज नाही", एवढेसे ती म्हणाली
तो नकाराने किती पोळून गेला !

वा!!क्या बात है!! फारच संवेदनशील लिहिलंत...छान :)
पु.ले.शु.
-आभाळ :)

नचिकेत's picture

सहमत आहे.

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!
छान!!

- नचिकेत आठवले

हाच

शेर मलाही खूप आवडला.

अत्युत्कृष्ट आहे.

हे चांगले आहेत, हे आवडले असे म्हणायला जागाच नाही.
सर्वच शेर उत्कृष्ट आहेत.

सोनाली जोशी यांची ही गझल एखाद्या गरत्या स्त्रीचा सुंदर चेहरा
पदरामागून ओझरता दिसावा अशी आहे.
कुठेही काही बेगडीपणा नाही, शाब्दिक फुलोरा नाही,
तरीही प्रत्येक शेर सच्चा, आत पोचणारा!

वा! -अशी दाद मोठ्याने द्यावी का की नुसतेच स्मित करावे?
माझे - ९/१०.

असेच लिहा.

तो नकाराने किती पोळून गेला!

गझल आवडली.

हुंदका साधा तुझा सांगून गेला
आसवांचा ओघही संपून गेला
हे आवडले.

" आज नाही", एवढेसे ती म्हणाली
तो नकाराने किती पोळून गेला !
हे खूप आवडले.

छान!

-
" आज नाही", एवढेसे ती म्हणाली
तो नकाराने किती पोळून गेला !

खूप छान आहे हे. संयमित तरी परिणामकारक.

द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला!

हा शेरही आवडला.

- सतीश

आनंदयात्री's picture

कोणती ही

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!

वा....... Great!!! खूप आवडला..

कुमार's picture

वा!

सोनाली,

द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला! - हा शेर सर्वांत आवडला.

मक्ताही सुंदर आहे.

- कुमार

रसिक's picture

मक्ता

मक्त्याचा शेर सर्वाधिक आवडला.

वा!

अतिशय संयत, सहजसुंदर आणि परिणामकारक गझल आहे सोनाली! मला बलराज सहानी (किंवा हॉलिवूड मधल्या जैक लेमन) ची आठवण झाली...
भेटण्याची वेळ आणि मक्ता खूप खूप आवडला!
-- पुलस्ति.

वा !

द्वाड होता शब्द माझा
भेटण्याची वेळ आणि
नकाराचा शेर
अप्रतिम जमून आले आहेत.

इतक्या साध्या शब्दात सहजपणे नकाराचा शेर बरेच काही सांगून जातो हे विशेष.

गझल आवडली

" आज नाही",

" आज नाही", एवढेसे ती म्हणाली
तो नकाराने किती पोळून गेला !
वाव्वाव्वा!!!

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!
गेला ह्या अन्त्ययमकाची मजा. आला, भेटला, निघून गेला! किंवा भेटण्याची वेळ पाळली असेही. वरची ओळ अगदी बोलती आहे.

द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला!
इथे द्वाडही चांगला वाटतो. 'निसटून गेला' खालच्या ओळीत यायला हवे होते असे वाटते.

मला काही वेरियेशन्झ सुचले---

शब्द तो ओठावरी आलाच नाही
नेमका डोळ्यांतुनी निसटून गेला

बंद ओठांनी किती जपले तरीही
शब्द तो डोळ्यांतुनी निसटून गेला

तिन्ही शेर विशेष आवडले. मतलाही चांगला निभावला आहे.
इतर शेरांत सुधारणेस वाव आहे.

सोनाली जोशी's picture

आभार्

सर्वांचे आभार.

गझल आवडली

भेटले मज लोक सारे टाळणारे
खेद हा की काळही सोडून गेला..

हा शेर खूप आवडला.
एकदम छान.