कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
बॉल तो या बॅटच्या लांबून गेला
कोण होता तो बुकी कळलेच नाही
बॉबचा जो बघ गळा दाबून गेला
पकडला, पुन्हा सटकला,बुळबुळा
आणि मोरीच्या तळीं साबून गेला
योजली मी आजही शाळेस दांडी
बाप माझा पण इथे डांबून गेला
आज का ती बस इथे आलीच नाही?
तास भरला, तरि विसु थांबून गेला
(-ज्येष्ठ गझलकारांची क्षमा मागून)
प्रतिसाद
हाहाहाहा!!!
आभाळ गडगडून हासले :) :) :) :)
मतला म्हणजे आपल्या Indian Cricket Team चे चित्र एकदम फंडू...
पुन्हा एकदा हाहाहाहाहा हिहिहिहिहि :)
-- गडगडणारे आभाळ .
योजली मी आजही शाळेस दांडी
योजली मी आजही शाळेस दांडी
बाप माझा पण इथे डांबून गेला
:-) आवडले.
आवडली....
विसुनाना,
हझल आवडली. मस्त. :-)
- नचिकेत आठवले
व्वा
विसुनाना
बॉल बॅटच्या लांबून जाऊनही षटकार मारलात.
मस्त.....
सुधीर
एक बालशंका : इथे २ विसुनाना आहेत काय ?
हो हो!
दोन विसुनाना आहेत तर!
एक विसुनाना इतरांसाठी
दुसरे विसुनाना स्वतःसाठी..
:)
दोन्ही विसुनानांची क्षमा मागून!
हझल आहे
.......
मस्त
विसूनाना,
हझल आवडली.. विशेषत: बॉबचा शेर.
- कुमार
सहमत
मतला आणि बॉबचा शेर छान आहे.
जाने कहा गये वो दिन.. अरे वा...
योजली मी आजही शाळेस दांडी
बाप माझा पण इथे डांबून गेला
विसुनाना शाळेत असतानाच्या आठवणी जागवल्या हो..
इथे college मध्ये दांडी मारण्यास college होतच नाही...!
आणि दांडी मारण्यासारखे cricket ही नाही..
पु.ले.शु.
आनंद.
हा हा!
मतला आणि शाळा-दांडी शेर मस्त आलेत!
-- पुलस्ति.
वा
विसुनाना, हझल आवडली.
हझल
विसूनाना
हझल छान आहे . पण एकंदरीत तुमची मीटरवरची पकड बघता
बॉल तो "या" बॅटच्या लांबून गेला
बॉबचा तो "बघ" गळा दाबून गेला
मधले अवतरणचिन्हातले शब्द भरीचे वाटले . तसेच मक्त्यातील सानी मिस-यात फारच ओढाताण वाटली.
क्षमस्व
मान्य आहे.
सानी मिसर्यातली ओढाताण आणि भरीचे शब्द... खरे आहे.
ही हजल थोडी ठीक करायला हवी होती.
पण हिरवशिंगे नेहमी घाईतच असतात म्हणे! :):)