कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
घाव माझा वाहता राहून गेला
ओंजळी माझ्या रित्या झाल्या कशाने
छेद तो हाती असे ठेवून गेला
झोप पिल्ला कोकिळेच्या काय यावी
काक अंगाई तया गावून गेला
हाक कोषातून आली कैक वेळा
"जन्म माझा घ्यायचा राहून गेला"
बरसला नाहीच वेडा काल रात्री
मेघ माझ्या सोबती येऊन गेला
उचलला मी तोच पेला ज्यात देवा
तो सुखा रे ओतण्या विसरून गेला
प्रतिसाद
छान आहे :)
ओंजळी माझ्या रित्या झाल्या कशाने
छेद तो हाती असे ठेवून गेला
हाक कोषातून आली कैक वेळा
"जन्म माझा घ्यायचा राहून गेला"
हे सर्वात जास्त आवडले!!
-आपले आभाळ :)
जन्म माझा घ्यायचा राहून गेला
हाक कोषातून आली कैक वेळा
"जन्म माझा घ्यायचा राहून गेला"
हे आवडले.
सहमत आहे.
देवदत्त,
गझल आवडली. 'जन्म' खासच. त्या कोकीळेच्या शेरात 'गावून' ऐवजी 'गाऊन' असे हवे होते का? कदाचित 'गावून' असा शब्दप्रयोग मी प्रथमच ऐकत असल्यामुळे जरा खटकला.
- नचिकेत आठवले
अनुमोदन !
मलाही हा शेर खूप आवडला.
मस्त
देवा
मस्त उतरल्ये,
ओंजळी माझ्या रित्या झाल्या कशाने
छेद तो हाती असे ठेवून गेला
झोप पिल्ला कोकिळेच्या काय यावी
काक अंगाई तया गावून गेला
हे जास्त आवडले,
उचलला मी तोच पेला ज्यात देवा
तो सुखा रे ओतण्या विसरून गेला
यात रे च्या जागी ला किंवा सुखासी असता तर ? मला अस वाटतय.. कविच्या मनात काय आहे ते माहीत नाही , कृपया सांगाल का?
सुधीर
उचलला मी
उचलला मी तोच पेला ज्यात देवा
तो सुखा रे ओतण्या विसरून गेला
कल्पना चांगली , मांडणी विस्कळीत!
--"ज्या पेल्यात देव - ईश्वर सुख ओतायला विसरला होता - तोच पेला नेमका मी उचललेला दिसतोय..."
'देवा + तो' हे जरा खटकतंय.
उचलला मी तोच पेला नेमका रे
ज्यात तो - सुख ओतण्या विसरून गेला
हे जरा ठीक वाटेल काय?
बाकी नंतर...
तो सुखा रे..
विसुनाना, जर हा शेर त्या देवाला संबोधीत करत नसेल तर?
'देवा'
देवदत्त - मक्ता 'देवा' असे अभिप्रेत आहे हे समजले.
त्याला '...' मध्ये घेतले असते तर हा गोंधळ झाला नसता.
'दत्ता' असा घेतला असता तर सोपे झाले असते.:)
असो. हा जरा 'दूसरा' गेला. होते असे कधीकधी!
देवा....
हाक कोषातून आली कैक वेळा...... वाह!
धन्यवाद मित्रांनो
नचिकेत.. सहमत.. गाऊन शब्द जास्त बोलला जातो.. आणि तो वापरायला पाहिजे होता..
चांगली आहे.
ओंजळी, अंगाई आणि हाक चांगले आहेत.
कांही निरिक्षणे-
'छेद' हा शब्द मराठीत 'भोके' या अर्थाने फारसा वापरला जात नाही.
तो हिंदीच्या जवळ गेला.'इस छतमें कितने छेद है |"
'छेद'चा सर्वसामान्य मराठी अर्थ तडा, कापणे असा होतो.
छेद तो हाती असे ठेवून गेला - ऐवजी-
तो क्षते हाती अशी पाडून गेला .. असे बरीक(अंमळ) बरे वाटले असते काय?
गंमत म्हणजे - असं म्हणतात की - कावळाच कोकिळेच्या पिलांना अंगाई गातो.:)
(कोकीळ /ळा आपली अंडी कावळाच्या घरट्यात ठेवते. आणि "National geographic' च्या एका episodeमध्ये ते खरंच दाखवलं होतं. - विषयांतर!)
मतला तितकासा जमला नाही.
पण मक्ता मात्र झकास! तो सर्वोत्कृष्ट शेर आहे.
गझल चांगली आहे.
माझे -६/१०.
वा!
देवदत्त,
गझल आवडली... मतला चांगला वाटला. मक्ताही आवडला.
कोकिळा - काक च्या शेरात थोडी सफाई हवी होती असं वाटलं. तसंच त्याचा अर्थ कळला नाही - कावळा अंगाई गाऊन गेला म्हणून त्याला झोप येत नाहीये का? (कावळा कोकिळेची अंडी पळवतो; पिल्लंही पळवतो का?... ह. घ्या.)
- कुमार
कोकिळा
कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते ही well known fact आहे. समाजात अशा बर्याच कोकिळा आहेत ज्या आपली पिल्लं कावळ्याच्या ताब्यात देतात, त्या पिल्ल्लांना कावळ्याच्या अंगाईवरच समाधान(?) मानावं लागतं. नाही का?
छेद.. विसुनाना.. you said it
छान
मतला आणि कोष आवडले देवा..
-- पुलस्ति.
मस्त देवा!
छान गजल देवा.. मक्ता, कोकीळ, कोशातला कळ्या.. आवडले
छान !!
देवा ही छान जमलीये गझल..
जन्म
जन्मचा शेर बेस्ट आहे. काही काही मिसरे अजून सुटसुटीत करता आले असते असं वाटलं. उदा. कोकिळेचा तसेच मक्त्यातला सानी मिसरा .