२१ : गिरीराज

गिरिराज's picture

हुंदका साधा तुझा सांगून गेला
'ये फिरोनी' दान हे मागून गेला

त्या दिशेला स्पंदनांची रांग धावे
सूर,वेणू ज्या दिशें त्यागून गेला

गोकुळाच्या स्नेहभावे थांबला ना
चौकटी साऱ्याच जो लांघून गेला

का यशोदे ढाळशी तू आसवें ही
भोग मातेचे तुला देवून गेला

व्यर्थही चिन्ता फळाची का धरावी
सत्य हे साधेच तो सांगून गेला

आस नाही भेटण्याची त्यांस आता
मुक्ततेची आस जो लावून गेला

माधवाला का कधी विसरेल राधा?
प्रेमज्योती अंतरी लावून गेला

प्रतिसाद

व्वा

गिरिराज

छान कल्पना आहे ही , आणि गझलही मस्त.

सुधीर

वा!

मस्त गिरी. छान जमली आहे.

आनंदयात्री's picture

माणिक.. काळ

माणिक..
काळजाला हात घातलात!

बस्स!! या गझलेसाठी माझ्याकडून एवढंच!!

विषयच अप्रतिम रे गिरी !

मस्तच रे गिरी... मस्तच !
आस नाही... जबरदस्त !
मक्ता... अप्रतिम !

भोग

शेर आवडला. शेवटचा शेरही मस्त आलाय!

भोग मातेचे..

हा सही आहे शेर.

नचिकेत's picture

भोग मातेचे...

हा शेर आवडला. गिरी, फक्त मुसलसल गझलच लिहिण्याचा इरादा दिसतो आहे. :-)

गझलची background देणारी ती वरची पहीली ओळ मात्र खटलकली. त्यामुळे वाचताना मनात पुर्वग्रह ठेऊन गझल वाचली गेली. गझल वाचताना वाचकांना स्वत:चे विचार/अनुभवांवरून होणार्‍या अर्थबोधाच्या प्रक्रियेवर त्या ओळी मुळे अन्याय झाला असे वाटले. चु.भु.दे.घे.

- नचिकेत आठवले

पहीली ओळ

नचिकेतशी सहमत.

बरी आहे.

माधवाला का कधी विसरेल राधा?
प्रेमज्योती अंतरी लावून गेला

ही ठीक.गझल पुन्हा लिहिली तर बरे होईल.
माझे - ४/१०.

प्रमोद खराडे's picture

व्यर्थ चिन्ता

चांगल आहे शेर, प्रेमज्योती सुद्धा आवडला.

व्यर्थ ही चिन्ता फळाची का धरावी

व्यर्थ ही चिन्ता फळाची का धरावी
सत्य हे साधेच तो सांगून गेला
आवडले.

व्वा मतला

व्वा मतला मस्त.
व्यर्थ ही .. हा शेर/द्विपदी नुसता वाचल्यावर त्याचा लगेच अर्थ लागत नाहिये किंवा मला लागला नाही.
चू भू द्या घ्या
आस नाही.. कोणी सांगेल?
नचिकेत पुलस्तिला अनुमोदन.

गिरिराज's picture

मेघा,

मेघा, 'कर्मफळाची अपेक्षाअ न करता कर्म करीत रहावे' हा गीतेतील संदेश मला अभिप्रेत आहे..
आस नाहि... क्रुष्ण गोकूळ सोडून गेल्यावर पुन्हा परतला नाहीच... हा संदर्भ आहे.

नचिकेत म्हणतोय ते बरोबर आहे. मी सुधारीत गझल पाठ्वली तेव्हा आधी दिलेली प्रस्तावनेची ओळ टाकू नये अशी विनंती केलेली पण ती नजरचुकीने दुर्लक्षित झाली असे वाटते!

विसूनाना,प्रयत्न करीन! धन्यवाद!

प्रस्तावना

गिरीराज,

प्रस्तावनेची ओळ नजरचुकीने राहून गेली होती. त्याबद्दल क्षमस्व.

गिरिराज's picture

धन्यवाद!

धन्यवाद! :)