२० : माणिक जोशी

हुंदका साधा तुझा सांगून गेला
भावनांची वेस तो लांघून गेला

आसवेडी आसवे ही मूक झरती
शब्द माझे सर्व तो शोषून गेला

बरसल्याविण मोकळे होणार नाही
मेघ मजला हेच समजावून गेला

पाहुनी निपचित निरागस वल्लरी ती
अंतरंगी वृक्षही मोडून गेला

दुःखितांचे लाख अश्रू सावराया
एक तव अश्रू पुरा होवून गेला !

प्रतिसाद

छान आहे

माणिक मस्तचरे

बरसल्याविण आणि वल्लरी चे शेर मस्त

सुधीर

छान

शेवटचा शेर आवडला माणिक.

कुमार's picture

वा!

माणिक,
आसवेडी आसवे... सुंदर.
हा शेर विशेष आवडला.
- कुमार

बरसल्याविण..

हा शेर सर्वात आवडला.

रसिक's picture

मूक्

मुक्या आसवांचा शेर आवडला

नचिकेत's picture

बरसल्याविण...

हा शेर छान.

- नचिकेत आठवले

चांगली आहे.

आसवेडी आसवे ही मूक झरती
शब्द माझे सर्व तो शोषून गेला

बरसल्याविण मोकळे होणार नाही
मेघ मजला हेच समजावून गेला

पाहुनी निपचित निरागस वल्लरी ती
अंतरंगी वृक्षही मोडून गेला

कल्पना चांगल्या. कवित्व आहे.
गझल चांगली आहे.
माझे - ६/१०.

प्रमोद खराडे's picture

सुंदर कल्पना

आसवेडी आसवे! फार छान.
बरसल्याविन.. मेघ समजावून गेल, आणि वल्लरी शेर आवडले.
कोणीतरी समजावून सांगतय! वाचायलाच किती छान वाटत.
नाहितर टक्केटोणपे अन ओरडा आहेच.

आभार !

खूप खूप आभार मित्रान्नो !

कल्पना जरी माझ्या असल्या तरी Finishing वैभव ने केल होत आणि स्वातीचेही मार्गदर्शन मिळाले !
दोन्ही गोष्टी अनमोलच !

वैभवा(मित्रा), स्वाती... शब्द अपुरे आहेत तुमचे आभार मानायला.. !

मेघ मजला हेच समजावून गेला

गझल छान आहे. मेघ आणि अश्रू आवडले.

आवडली

एकूणच सर्व गझल सहज सुंदर उतरली आहे.
सर्वच शेर चांगले..पण आसवेडी आसवे अप्रतिम :)
-आपले आभाळ :)

बरदसल्याविन..

माणिक छान.
विसुनाना आणि सगळ्यांना अनुमोदन. लिहीत रहा.