कार्यशाळा प्रवेशिका ८ : विसुनाना

हुंदका साधा तुझा सांगून गेला
मख्मली हुंकार ते - तुडवून गेला

मज कशाला सांगता त्या कृष्णलीला?
अंगणी मम काल तो रांगून गेला

भागल्या क्षितिजा अता बघ झोप आली
खगथवा बघ दूर तो पांगून गेला

जात होता तो कुठे? - कळलेच नाही
दशदिशांच्या रिंगणी रंगून गेला

रात्रीलाही नीज येई - बाहुपाशी
चांद - केशीं माळला - पेंगून गेला

जागजागी मद्यशाला या कशाला?
मत्त जो तो अंतरी -झिंगून गेला

प्रतिसाद

व्वा!

मज कशाला सांगता.. सुंदरच.

मक्ता जसा कळला, पूर्ण पटला नाही.

छान

-संपूर्ण आशय कळला असं वाटलं नाही तरी वाचताना छान वाटली.

रात्रीलाही नीज येई - बाहुपाशी
गागागागा गाल गागा गालगागा
असं झालंय का?

आणि शेवटच्या शेरात 'तो' आणि 'जो' च्या जागांची अदलाबदल केली तर कसं वाटेल विसुनाना?

-सतीश

चांगली आहे...पण..

गझल चांगली वाटली... पण अजुनही सुधारीत आवृत्ती निघणे शक्य आहे असे वाटते...

रात्रीलाही नीज येई - बाहुपाशी
चांद - केशीं माळला - पेंगून गेला

हा शेर तुटक तुटक वाटतो...

जागजागी मद्यशाला या कशाला?
मत्त जो तो अंतरी -झिंगून गेला
हे आवडले :)
--आभाळ :)

झाड's picture

मज कशाला

मज कशाला सांगता त्या कृष्णलीला?
अंगणी मम काल तो रांगून गेला

हा शेर प्रचंड आवडला! खूपच सही!!

नवोदित काव्य

मेघधारा,सतीश,आभाळ, झाड यांचे आभार.
आयुष्यात पहिल्यांदा लिहिलेली गझल.
चुका माफ कराव्यात.

(ता. क. : या गझलेचे कांही शेर मीटर, पुनरावृत्ती अशा दुरुस्त्या करून
मग निर्दोष झाले आहेत. त्यासाठी सारंग पतकी यांचे आभार.)

बरी आहे.

विसुनाना,
हे स्पष्टीकरण देणे म्हणजेच गझल फसल्याचे लक्षण!
मज कशाला सांगता त्या कृष्णलीला?
अंगणी मम काल तो रांगून गेला

भागल्या क्षितिजा अता बघ झोप आली
खगथवा बघ दूर तो पांगून गेला
हे ठीक.

चांद - केशीं माळला - पेंगून गेला
अवघड वाटला.

बाकीचे जुने वाटले.
माझे - ४.५/१०. पुन्हा लिहा.

रसिक's picture

चला

नाना, स्वत्:च्या गझलेचे एवढे कठोरपणे परीक्षण्-- त्याकरता माझ्याकडून एक घ्या, म्हणजे गझलेला ५.५/१० मिळाले...

छान!

कृष्णलीला, खगथवा (जरा हा शब्द बोजड वाटतोय, तरी) आणि रंगून (जरी मला पूर्ण कळलाय असे वाटत नाहिये तरी) हे शेर आवडले!
रात्र - रात्रीलाही मधे दोष आहे. आणि एकुणच रचना कठिण झालीय - अर्थात तुम्हीच केलेलं परखड परीक्षण आताच वाचलं :)
मतला आणि शेवटचा शेर (माझ्यापुरतं मी मक्ता म्हणणं सोडून दिलंय:)) - ठिक ठिक.
तुमची सर्व रसग्रहणे आवडतात. आणि तुम्ही दिलेल्या गुणांबद्दल मला नेहेमीच उत्सुकता असते :)
-- पुलस्ति.

कल्पना आवडल्या

कृष्णलीला, रांगणे, झोपाळलेले क्षितिज, झोपाळलेली रात्र, केसात माळलेला चंद्र ह्या कल्पना आवडल्या.

सुन्दर गजल ...!

आशय छानच !
पुलस्तिशी सहमत... बोजड शब्दाबाबत !
अजून सोप्या शब्दात उतरायला हवी होती अस मला वाटल !

कुमार's picture

वा!

वा विसूनाना,
गझल आवडली. तुम्ही मतल्यात वेगळं यमक ('गून' टाळून, अलामत पाळली आहे) वापरलंत आणि नंतर रांगून, पेंगून, पांगून इ. वापरलंय.. हे आवडलं.
रात्रीलाही नीज येई - बाहुपाशी
चांद - केशीं माळला - पेंगून गेला
हा शेर सुंदर..!
- कुमार

नचिकेत's picture

दोन...

"मज कशाला सांगता " आणि "जात होता तो कुठे" हे दोन शेर आवडले. इतरांवर विचार चालू आहे. :-)

पु.ले.शु.
- नचिकेत आठवले

सौंदर्याचे पूर्वग्रह

काही कल्पना आपल्या डोक्यात जास्त पक्क्या असतात आणि आपण तसच वाचतो.
क्रुष्णलीला.. बरोबर उल्या मिसर्‍यात रंगून गेला.. वाचलं गेलं होतं.

चांगली आहे..

जागजागी मद्यशाला या कशाला?
मत्त जो तो अंतरी -झिंगून गेला...... हा आवडला

कृष्णलीला

कृष्णलीला चा शेर मस्त आहे विसूनाना. बाकी शेर पण छान जमले आहेत. आवडली