राहून गेले

"मनासारखे जगायचे राहून गेले
खळखळून हसायचे राहून गेले
बोललो कितीदा स्वत:शी मी
हितगुज पुसायचे राहून गेले
वाहलो बेधुंद असा मी की
किनारा जपायचे राहून गेले
दूर राहिला गाव तो माझा
फिरुन परतयाचे राहून गेले
सरली रजनी सताड नयनांनी
स्वप्नांना भेटायचे राहून गेले
सावरले मी किती व्यथांना
स्वत: सावरायचे राहून गेले......"
रुपस्वप्न.....
9225816539
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
मित्रा व्रुत्त सांभाळ...
रुपस्वप्न,
मित्रा व्रुत्त आणि मिटर सांभाळ मग सोपं होइल सारं...
मार्गदर्शन करावे
विद्यानंद सर,
क्रुपया विश्लेषण करावे....
संपर्क साधावा....
9021590798 या नंबरवर आपणास विश्लेषण मिळेल