जगने वळुन गेले...

विमोक्ष's picture

नाद जिंदगीचा केला,जगने छळुन गेले
पेटले निखारे असे,आयुष्य जळुन गेले

साथ साथ होते सारे,मी चालविला हा मेळा
मी असता पिछाडीला,का सारे पळुन गेले?

पर्नझडी आयुष्य हे,जपुन मी का ठेविले?
कधी येई पावसाळा,पान सारे गळुन गेले

परिसाचे शब्द त्यांचे,का घेतले मी वेचुनी
बोलले किती वाईट,उशीरा कळुन गेले

भेटले सगळे शहाणे,मी "मोक्ष" त्यांना मागला
येउन भेटीस माझ्या,दु:ख चिघळुन गेले

आर्त हाक मरणाची,माझ्या कुणी ना ऐकीली
आले मयतीस माझ्या,खांदे वगळुन गेले

कास सोडली जगाची, ना मागे कधी फिरलो
फिरवून वाट माझी,जगने वळुन गेले.

अबोली's picture

शुभेच्छा !

उत्तम लीहित आहात नीरन्तर लीहित रहा.......शुभेच्छा!

विमोक्ष's picture

धन्यवाद

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...
आपली एखादि गझल मिळेल का वाचयला...?

विपुल