हाय माझी जिंदगी...

Vidyanand Hadke's picture

जीवनाला भार झाली हाय माझी जिंदगी
वंचनांचे दार झाली हाय माझी जिंदगी

मी जरासा काय तीचा हात हाती घेतला
अन खुषीवर स्वार झाली हाय माझी जिंदगी

पाहतो मी स्वप्न तेची मोहराया आजही
स्वप्नवेडी फार झाली हाय माझी जिंदगी

प्रेम माझे व्यक्त करण्या वेळ इतका लागला
की, वयाने पार झाली हाय माझी जिंदगी

काळजी करतो कुणाची सांग रे वेड्या मना
काळजीने ठार झाली हाय माझी जिंदगी

मुक्त का होतो कुणीही बंधने येता पुढे
बंधनांचे सार झाली हाय माझी जिंदगी

कंठ माझा दाटलेला मोकळा केलास का?
आसवांची धार झाली हाय माझी जिंदगी

मी कुणा सांगू कसा की काय झाले शेवटी
टाकलेला हार झाली हाय माझी जिंदगी

डॉ.कैलास्'s picture

तंत्रशुद्

तंत्रशुद्ध गझल... अभिनंदन्

निशिकान्त्'s picture

हाय माझी जिंदगी...

हाडकेजी,
मस्त झालीय गजल. दुसरा शब्दच नाही. तुम्ही एवढ्या छान छान गजला लिहिता की तारीफ करण्याकरिता शब्द अपुरे पडतात.
पाहतो मी स्वप्न तेची मोहराया आजही
स्वप्नवेडी फार झाली हाय माझी जिंदगी
वा!वा! एकच का? अनेक स्वप्ने पहा आणी जिदन्गी अजून स्वप्नवेडी होऊ द्या.
आपल्या अर्थपूर्ण आणी तरल गजला ऍकण्यास लोक नेहमीच उत्सूक असतील हे लक्षात घेऊन खलील शेर सुचला.
ऍकण्या गजला सुरील्या लोक जमती भोवती
मारुतीचा पार झाली हाय माझी जिंदगी
आपण मक्ता लिहित नाही आणी तो आवश्यक ही नाही. पण लिहिलाच असता तर कसा असता? माझी कल्पना:
दंग " विद्यानंद" होई रंग भरता जीवनी
कल्पना साकार झाली हाय माझी जिंदगी
आपल्या गजले समोर हे शेर गालिच्या समोर घोंगड्याच्या ठिगळा प्रमाणे दिसतील पण मनात आलेले व्यक्त केले.

बहर's picture

अभिनंदन!!

हडकेजी.. नेहमी प्रमाणे छान गझल.शुभेच्छा. :)

shantaram's picture

" कंठ माझा

" कंठ माझा दाटलेला मोकळा केलास का?
आसवांची धार झाली हाय माझी जिंदगी "

अप्रतिम द्विपदी..

मतल्यात 'जीवन'आणि'जिंदगी' एकाच अर्थाचे आल्याने गमंत येत नाही.

तुमची इच्छा असेल तर एक इस्लाह सुचवू शकतो.

संदीप अ. बनसोडे's picture

प्रतिक्रिया

वा सुरेख सर, हाय माझी जिन्दगी

संतोष कसवणकर's picture

क्या बात है!

अप्रतिम! शब्द नाहीत!

melikegirl's picture

But the school does not

But the school does not exercise long travesti cultivate what the text, travesti But to exercise any of their views are not ignorant of science text, genuineThere are three methods to study eye-mouth are to be believed Parties read this do not admire one another not to playhe travesti is not the end Width is limited to the travesti lag plug tight through hard work Notes with suspected heart seek to ensure justice asked AV Net Jian Jie, brush, clean the walls are

रामकुमार's picture

मस्त

मस्त गझल!
विद्यानंदजी,बहोत खूब

Vidyanand Hadke's picture

thank you my dears...

thank you my dears...

george22's picture

कवाफी अथवा

कवाफी अथवा रदीफ कुणाची खाजगी मालमत्ता नसते.....त्यामुळे आपण कोणताही प्रसिद्ध्/अप्रसिद्ध काफिया/रदीफ वापरु शकतो....
माधव ज्युलियन,भटसाहेब,इलाहीजी,घनश्य्:म धेंडे ह्या दिग्गजांनी मरठी गझलेस इतके सम्रूद्ध केले आहे,की कळत नकळत त्यांच्या लिखणाचा प्रभाव बर्‍याच शायरांवर पडला आहे.असो..
70-291 dumps || 70-293 braindumps || 70-294 braindump || 70-401 brain dumps || 70-432 dump || 70-433 dumps || 70-448 braindumps || 70-450 dump ||

myjordanmax's picture

Jordan Shoes Air Jordan