कार्यशाळा प्रवेशिका ९ : (मायबोली गझल कार्यशाळेतील विजेते) नचिकेत आठवले

नचिकेत's picture

हुंदका साधा तुझा सांगून गेला,
शब्द माझा केवढा टोचून गेला!

मी कधी ना घेतले चाळून कोणा
भेटला जो , तो मला गाळून गेला

कोणती इच्छा अशी धरली मनी तू?
पापणीचा केस खंतावून गेला!

बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला

ज्यास मी होत्या दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला

हा खुलासा मागती आक्रंदणारे,
तो चितेवर का असा हासून गेला?

-- नचिकेत आठवले.

प्रतिसाद

विजेत्याला साजेशी...

सुंदर अशी गझल!! यहां से वहां तक ए टू झेड आवडी :) : )
पापणीच केस खंतावून जाणे आयुष्यभर अविस्मरणीय :)
--आपला आभाळ :)

परीवश's picture

वाहवा!

बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला

ज्यास होत्या मी दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला

अहाहा! अप्रतिम!! मस्त आहेत हे शेर.
मतलाही आवडला. मक्ता सुद्धा बरा आहे; पण कल्पना बर्‍यापैकी नेहमीची. हरकत नाही. मांडणी सहज झाली आहे.

पापणीचा केस कळला नाही

- परीवश

आनंदयात्री's picture

नचिकेत...

नचिकेत... मित्रा तोडलंस!!

कोणती इच्छा अशी धरली मनी तू?
पापणीचा केस खंतावून गेला! ------ कसं सुचलं रे??

ज्यास होत्या मी दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला -------- आवडला...

हा खुलासा मागती आक्रंदणारे,
तो चितेवर का असा हासून गेला?----- नाही कळला.. (शब्द आवडले, अर्थ नाही पोचला)

मी कधी ना घेतले चाळून कोणा
भेटला जो जो, मला गाळून गेला------ यावरून सुरेश भटांचा एक शेर आठवला-

"भेटण्यासाठी कुणी आलेच नाही...
लोक आलेले मला चघळून गेले!"
असो.. ही गझल आवडली..
शुभेच्छा!

छान आहे

नचिकेत
छान आहे गझल ,
पण मलाही शेवटचा शेर नीट कळला नाही . बाकीचे सारे मस्तच आहेत.

अप्रतिम..

नचिकेत थोडा इतरांनाही वाव द्यावा! :)
इथेही बाजी मारायचा इरादा दिसतोय.

मतला किती सहज आणि भावस्पर्षी!

मी कधी ना.. क्या बात है!!

कोणती इच्छा.. अगदी हाय!

बांधले होतेच त्याने.. सलाम!!!

मक्ता वाचून तर माझ्यासरख्यांच्या गझलांनाच तो हसून गेला असं वाटलं.. :)

तू लिहीत रहा काय म्हणणार..?

आम्ही वाचत राहू.

अत्युत्कृष्ट

हाण तिच्या XXX!

कोणती इच्छा अशी धरली मनी तू?
पापणीचा केस खंतावून गेला!

बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला

ज्यास होत्या मी दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला

हे तीन्ही शेर हीरे आहेत की रे, नचिकेता...

पापणी कोहीनूर!
ती तर परत बालपणात घेऊन गेली. पालथ्या मुठीवरचा तो पापणीचा केस, ती निरागस इच्छेइतकीच हळुवार फुंकर...
सारे एका झटक्यात स्वच्छ दिसले.
हरवलेले क्षण पुन्हा गवसले त्या एका शेराने.

बाकीचे शेर सुद्धा रत्ने आहेत.पण जरा जुन्याच कल्पना!
माझे - ९/१०. अत्युत्कृष्ट!
(फक्त गाळीव गझला लिहायचा बेत दिसतोय.
इकडे एकही दुसरी गझल नाही.
जास्त वाचावे ही निरागस इच्छा -
जास्त लिहावे हा आगंतुक सल्ला!)

ता.क.
बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला
मधे पंख आणि पाय यांची अदलाबदल केल्यास logically
जास्त योग्य ठरेल असे वाटले.
माझे उडणे तर बंद झालेच होते - आता साधे चालणेही दुरापास्त झाले.
{माझ्यातला कवी तर पूर्वीच मेला होता - आता मी साधा माणूस म्हणूनही
जगू शकत नाही.}
असे!
विचार करावा. कल्पना तुमची आहे!

नचिकेत's picture

पारधी...

छाटले होतेच त्याने पंख माझे,
आज माझे पायही बांधून गेला

हा विचार केला होता, विसूनाना. पण....

लहानपणी पारध्याच्या जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांची गोष्ट ऐकली असेल तुम्ही. आताशा तो पारधीही थोडा हुशार झाला आहे...

- नचिकेत आठवले

बांधले..

हा अप्रतिम शेर वाचताना मला लागलेला अर्थ असा होता की व्यवहारात अपेशी ठरलो होतोच, आता स्वप्नांचे पंखही नशीबाने छाटून टाकले..

मस्त गझल आहे, नचिकेत.

ठिणगी आणि वणवा

-नचिकेत,

छान आहे गझल.

बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला

ज्यास होत्या मी दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला

हे दोन शेर विशेषच! मात्र वणवा मला जाळून गेला, पोळून गेला अशा प्रकारच्या expression ऐवजी 'विझवून' गेला असं का म्हणावं वाटलं तुम्हाला हे कुतूहल आहे.

-सतीश

मला वाटते-

एस्सेम सतीश,
माझ्या मताप्रमाणे 'मी' जो ठिणग्या देणारा आहे - त्याला कोणी कशाला वेगळे जाळायला हवे? तो तर जळतोच आहे. तो विझेल.
अनेक मतिथार्थ -
१. घेता घेता एक दिवस - आजच्या कृतघ्न प्रवृत्तीनुसार - खरोखरच देणार्‍याचे हातही तोडून घ्यावेत कुणीतरी...
२.माझा शिष्य - ज्याला मी गाणे शिकवत असे - त्या मैफिलीत असा गायला की मी भरून पावलो. आता यापुढे गावे अशी इच्छाच उरली नाही.
शायराला कोणता अभिप्रेत आहे - तो सांगेल - किंवा - नाही सांगणार - त्याची मर्जी! :)

नचिकेत's picture

धन्यवाद

विसूनाना,

तो तर जळतोच आहे>>>> तुम्हीच हे लिहिले हे बरे केले. इतक्या चांगल्या शब्दात मी सांगू शकलो नसतो. :-)

- नचिकेत आठवले

विसुनाना, नचिकेत,

-अर्थाबद्दल माझी शंका नव्हतीच. तुम्ही मांडलेला आशय साधारण तसाच मला प्रतीत झाला होता. पण कवीच्या विचार प्रक्रियेबद्दलची माझी उत्सुकता मांडली होती मी. वणव्याचा प्रभाव कुणाला विझवू शकतो असं expression आलं त्याबद्दल होती ती उत्सुकता.
पण विसुनाना म्हणतात त्याप्रमाणे - सांगणं, न सांगणं ही शायराची मर्जी! :)
-सतीश

झाड's picture

खूप खूप

खूप खूप खूप आवडली ही गझल!
पापणीचा केस.... खरंच कसं सुचलं?
मतला अजून छान करता आला असता. बाकीचे सगळे शेर केवळ अप्रतिम!

वा!

मतला प्रवाही आला आहे! चाळून्/गाळून, ठिणग्या - हे शेरही खूप आवडले.
पण पापणीचा केस - केवळ अप्रतिम नचिकेत!!
विसुनानांचे ९ गुण - क्या बात है!!
-- पुलस्ति.

अप्रतिम!

सुरेख गजल. सर्वच्या सर्व शेर सुंदर आहेत. आवडली.

नचिकेत's picture

आभार!!!

इथल्या सर्व रसिकांना मनःपुर्वक धन्यवाद!!!

नचिकेत, सुधीर,
परिवश म्हणतात त्याप्रमाणे 'खुलासा' च्या शेरातली कल्पना तशी जुनी आहे. कधी भेटण्याचा योग आला तर आपण बोलू त्यावर.

मेघा,
हे हसून जाणे वगैरे म्हणजे काहीतरीच!!! :-) तुझ्यासारखेच जर सगळे गझल लिहिणारे असतील तर मग गझलप्रेमींची चंगळ आहे.

झाड, मतल्याबद्दलची comment एकदम मान्य!!

स्वाती, मार्गदर्शनाबद्दल तुमचे आभार.

सर्वानाच पुन्हा एकदा धन्यवाद!!!
- नचिकेत आठवले

ता. क. हा प्रतिसाद देत असतानाच, वैभवने मिसर्‍यांचा सुटसुटीतपणा आणि लय improve करण्याच्या दृष्टीने बदल सुचवले. दुसर्‍या व पाचव्या शेरात हे बदल केले आहेत. छोट्याश्या बदलाने शेराचा प्रभाव कसा वाढू शकतो ह्याची शिकवणी मिळाली. :-) वैभव, धन्यवाद!!

शब्द माझा केवढा टोचून गेला!

हुंदका साधा तुझा सांगून गेला,
शब्द माझा केवढा टोचून गेला!

वा. मतला सर्वाधिक आवडला.

अप्रतिम रे नचिकेता !

तशी मतल्यापासून मक्त्यापर्यत आवडली रे !
वणवा... अप्रतिम !
मक्ता... खूपच सहज उतरलाय !
पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा !

अप्रतिम

सगळेच शेर अतिशय सुंदर जमलेत.क्या बात है.मजा आया.असेच सुंदर लिहित रहा.

नचिकेत,

नचिकेत, फारच सुरेख रे. सगळेच शेर अप्रतिम आहेत. खूप आवडली.

आनंद रघुनाथ's picture

चन्द्र आणि

चन्द्र आणि चांदण्यांनी युक्त आहे राज्य माझे.
नाव माझे रातराजा रात्रिचे साम्राज्य माझे.....

व्वाह नचिकेत! छानच
गझल खूप अवडली. विशेषतः १,४ आणि ६वा शेर.

वाह वा, अप्रतिम्

नचिकेत,
गजल नखशिखांत सुंदर आहे.
पापणीचा केस - इतकं साधं सोप्पं आणि इतक्या समर्थ शब्दात.
ठिणग्या - मला दिसलेला अर्थ थोडा वेगळा आहे. ज्याला मी मदत करत गेलो, तो त्या मदतीच्या जीवावर इतका "मोठा" झाला की, क्रूतघ्नपणे त्याने मलाच संपवलं!
मक्ताही अप्रतिम - किती वेगवेगळे अर्थ निघतायत.
सु.न्दरच गजल!
--शलाका

कुमार's picture

सुंदर

वा नचिकेत,
गझल आवडली.
मतला सहज आणि अर्थपूर्ण आहे.
शेवटचे तीन शेर फारच आवडले!
- कुमार

प्रमोद खराडे's picture

सुरेख !

सुरेख !

प्रथमेश's picture

सुंदर

नचिकेत

मी या संकेतस्थळाचा अगदी नवीन सदस्य. गझल लिहीतो पण फार नही. पण गझल या काव्यप्रकारबद्दल मला खूप आवड आहे.
तुमची गझल वचली. खुप सुन्दर अहे गझल. अवडली! पहील्याक्षणी प्रेमात पडाव तस काहीतरी! खरच अप्रतीम अहे गझल.

sayhi2anand's picture

बांधले होतेच...


बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला

ज्यास मी होत्या दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला

कहर केलास मित्रा ...
इतर शेरही तोडणारे आहेत..

मला आवडलेला...

कोणती इच्छा अशी धरली मनी तू?
पापणीचा केस खंतावून गेला!

आनंद माने

रसिक's picture

सुरेख

गझल सुरेख झाली आहे.

नचिकेत's picture

पुन्हा एकदा...

सर्वांना पन्हा एकदा धन्यवाद!!

- नचिकेत आठवले

बांधले

बांधले होतेच त्याने पाय माझे,
आज माझे पंखही छाटून गेला

वाव्वा!! हा शेर उत्तम आणि पक्का आहे.

वाह !!

मी कधी ना घेतले चाळून कोणा
भेटला जो , तो मला गाळून गेला .. आवडला

कोणती इच्छा अशी धरली मनी तू?
पापणीचा केस खंतावून गेला! .... पापणीचा केस खंतावण्याची कल्पना छान..

ज्यास मी होत्या दिल्या ठिणग्या कितीदा
आज तो वणवा मला विझवून गेला...मस्त.. !!

मस्त

गझल पूर्ण आवडलीच . बाकी बदल आपण केलेच आहेत. एक फक्त
बांधले होतेच त्याने पाय माझे

ह्या शेरावर माझे जाणकारांशी प्रचंड वादविवाद :-) चालू आहेत. भेटशील तेव्हा सविस्तर बोलूच