मी चाललो.......!

पुष्कर कुमार's picture

अर्ध्यात थांबला ना माझा सवाल आहे
रक्तात जाळली मी माझी मशाल आहे.....

लावून मी पनाला प्राणास पाहिले पण्
चुपचाप सोसले रे दुनियेत हाल आहे....

डोळ्यात ह्या तुझ्याही येईल आज पाणी
या आसवात माझ्या इतकी मजाल आहे...

प्रत्येक काळ माझा विरहात काढला मी
विसरुन दु:ख सारे जगतो खुशाल आहे....

दे एक रात्र "साकी" स्वप्नात जागण्याची,
'आयुष्य' हे तुलाही माझे बहाल आहे....

मी बांधले जरी घरटे काच-कांचनाचे,
ते ही "तुझ्याविना" गे.. सारे अकाल आहे....

मी चाललो अता बघ,संसार सोडूनी हा..
ओला असा तुझा का झाला रुमाल आहे....

-पुष्कर राउत
9767734472
e-mail-mpushkarr@gmail.com

निशिकान्त्'s picture

मी चाललो.......!

दे एक रात्र "साकी" स्वप्नात जागण्याची,
'आयुष्य' हे तुलाही माझे बहाल आहे....
बहूत खूब! क्या बात है. आनंद कंद छंदातील सुरेख गजल!

खालील ओळीत युती भंग झाला आहे
मी बांधले जरी घरटे काच-कांचनाचे,
घर पर्यंत ओळीचा पहिला भाग आहे आणि टे दुस-या भागात आले आहे. ही ओळ खाली दिल्या प्रमाणे होऊ शकते का याचा विचार करावा.
मी बांधलेय घरटे बघ काच कांचनाचे.

पुष्कर कुमार's picture

सर,तुम्ही

सर,तुम्ही सुचविलेली ओळ अगदी अचुक होईल....
धन्यवाद...!असेच माझे कुठे चुकत आहे,हे मला वेळोवेळी..सांगावे ही नम्र विनंती...!
काल सुचलेला एक शेर मी आज add केला आहे...
आस्वाद घेणे...
डोळ्यात ह्या तुझ्याही.......!

डॉ.कैलास्'s picture

पुष्कर राव...

तंत्र ठीक आहे,पण आशय आणि अभिव्यक्ती यात आपण अजून सुधारणा करायला हवी.... वाटल्यास मला
9004933773 या नंबरवर फोन करा.

michaeljii's picture

आसवे नकली

आसवे नकली जरी ती बोलबाला जाहला
आज मगरीसम जमाना का रडाया लागला ?

आसवे गाळून त्यानी साधली जवळीक पण
मी लपवल्या आसवांचा भाव कोणी पाडला ?

नाटकाचे आज जगती स्तोम इतके माजले
हात मायेचा कधी मज गारद्याचा वाटला

पेटल्या लाखो मशाली फक्त दिसती या जगा
तेवणारा दीप का मग वळचणीला टाकला ?

बेगडी आयुष्य सारे कळवळाही बेगडी
ओंगळाला सजवण्याचा चंग कोणी बांधला ?

मंदिराच्या पायरीवर भक्त ना रुचले मला
माजगा जो नोट टाकी याचका तो चांगला

संपदा गडगंज होती खूप त्याला मित्रही
प्रेतयात्री लाख होते ना कुणी पाणावला

दूर अंधारास करण्या जन्मला तो पण तरी
सूर्य का थकल्या प्रमाणे आज ग्रहणी वागला ?

हात वारूळी मराया घातला "निशिकांत"ने
अस्तिनी तुझियाच होता साप वेड्या नांदला
|testking|test king|testkings|testking VCP-410|testking 350-001|

cरिस्तिन's picture

मैं कहता

मैं कहता हूं कि इस किताब को एक धीमी गति से पढ़ने के लिए है नहीं, क्योंकि मैं इसे डाल नीचे समस्या थी, लेकिन कई बार यह निराशा होती थी कि बाघ के मूल कहानी लग रहा था के करीब जाने कभी नहीं. यह एक स्थानीय इतिहास के पाठ की तरह पढ़ता है, मुख्य पात्रों में से कई की एक जीवनी का श्रृंखला और बाघों के एक प्राकृतिक इतिहास सब एक साथ मिश्रित खाते. मुझे नहीं लगता कि मैं कभी भी एक किताब है महसूस से दूर आने की तरह मैं बेहतर की घटनाओं के संदर्भ में पता था. पोस्ट सीओ रूस के अकेले बनाया छवि पुस्तक की कीमत के लायक है.
cheap flights | sunglasses | digital cameras | shoes | hotels | cheap flights | hotels | furniture | handbags | hotels | cheap flights | jewelry