गेला

गेला
भोवतीचे बोल सारे जाळती माझ्या मनाला
हा कटाक्ष जिंदगीचा बिघडोन पार गेला
मन्त्र माझे हे सुखाचे पेलती काय दुःखाला?
नेत्रांतला आसवांचा ओसरूनी पूर गेला
संगतीने या फुलांच्या येत गंध रंगांसही
धुंदीतल्या जीवनाचे सांगुनी हा सार गेला
वाटेतले सर्व काटे काय देती दोष झाडा
काळजातील सल तोची हृदयाच्या पार गेला
वेलीवरी या फुलांच्या चाललेल्या खाणाखुणा
प्रेमरंगी रंगताना पालटूनी नूर गेला
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
prakashkshirsagar@yahoo.co.in
9011082299
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
हे शेर आवडले
संगतीने या फुलांच्या येत गंध रंगांसही
धुंदीतल्या जीवनाचे सांगुनी हा सार गेला
वेलीवरी या फुलांच्या चाललेल्या खाणाखुणा
प्रेमरंगी रंगताना पालटूनी नूर गेला
वरील दोन्ही शेर खूप आवडले
अलामत जुळल्यास अजून आवडतील
अशातच साईट वाचत असल्यामुळे उशीरा प्रतिसाद देत आहे