गाणे कसे सुखाचे

दुःखात गात जावे गाणे कसे सुखाचे
डोळ्यांत आसवांचे गाणे असे सुखाचे?
नात्यात गुंतलो मी माझ्याच मानलेल्या
फेडून आज जावे देणे कसे सुखाचे?
माझ्या मनात आता असतात गोड गोष्टी
रुजताच लिहित जातो सुचती जसे सुखाचे
माझ्याच भोवताली येतात सर्व प्राणी
देऊ किती तयांना आता पसे सुखाचे
वाटेत चांदणे हे येईल संगतीला
रात्रीत चालताना येती जथे सुखाचे
असतात सागराची रूपे किती अनोखी
लाटांतले फवारे घेती वसे सुखाचे
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
prakashkshirsagar@yahoo.co.in
9011082299
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
गाणे कसे सुखाचे
आनंद कंद माझा आवडता छंद आहे. आपली गजल ह्रदय स्पर्शी आहे. खूप खूप आवडली. आपली गजल वाचून मला खालील शेर सुचला जो पेश करीत आहे. या वेब साईट चा पण त्यात समावेश केला आहे कारण या साईट मुळेच एकमेकाच्या गजला वाचवयास मिळतात व अप्रत्त्यक्ष का होईना आपल्या ओळखी होतात. काफिया आणी रदीफ आपलाच
वापरला आहे.
मॅफल अखंड व्हावी कसदार शब्द यावे
गजलेतली तरलता खुलवी हसे सुखाचे
धन्यवाद!
मो. नं. 98907 99023
E MAIL nishides1944@yahoo.com