आसवे....! (देव प्रिया छंद)

पुष्कर कुमार's picture

आज माझ्या अंतरी घोटाळती रे आसवे
"सावराया हात दे तू..!" बोलती रे आसवे...

सांग स्पर्शाने कधी ह्या काळजाळा जाणले..?
काळजाची वेदना सांभाळती रे आसवे...

यार हो..!उध्वस्त केले आपुले घरटे तरी,
आसवांना साथ द्याया धावती रे आसवे...

हारण्याची खंतही त्याने कधी केली 'युगा'?
जीवनाचे डाव खोटे सोसती रे आसवे...

आणखी मी कोणता देऊ पुरावा सांग ना..!
दूर 'ती' गेली कशी? हे सांगती रे आसवे...

आसवे..ही..आसवे..!आली कशी गालावरी?
हात प्रीयेचे खुनी धुंडाळती रे आसवे...

पापणीने कोणत्या मी स्वप्न झाकू लोचणी..?
स्वप्न माझे वादळी ठेचाळती रे आसवे...!

पुष्कर राउत
Mob:9767734472
E-mail:mpushkarr@gmail.com
प्रतिसाद कळविने..!

निशिकान्त्'s picture

आसवे...

सांग स्पर्शाने कधी ह्या काळजाळा जाणले..?
काळजाची वेदना सांभाळती रे आसवे...

पुष्कर, खूप खूप छान! मुबारक. कल्पना आणी शब्द नियोजन दोन्कीही छान
आपण नवीन गजल प्रकाशित करत आहात का? मी प्रथमच आपली गजल वचतोय.
आपणास लाख लाख शुभेच्छा.
माझा मो.नं. 98907 99023 आणी E MAIL nishides1944@yahoo.com आहे

Vidyanand Hadke's picture

अनेक शुभेच्छांसह...

हारण्याची खंतही त्याने कधी केली 'युगा'?
जीवनाचे डाव खोटे सोसती रे आसवे...

वा वा सुंदरच गझल झालीय
कुठे दडला होतास रे आजवर, तुझ्या आणखी गझलांच्या प्रतिक्षेत.....
अनेक शुभेच्छांसह...