जमते तुला कसे गं?

एकांत वास जगणे जमते तुला कसे गं?
कोषात बंद झुरणे जमते तुला कसे गं?
बोलावता तुला मी लाजून दूर जाशी
स्वप्नी नजीक असणे जमते तुला कसे गं?
चाहूल लागता तव मी सॅरभॅर बघतो
म्रुग (MRUG)जळ बनून दिसणे जमते तुला कसे गं?
केले वजा तुला जर आयुष्य शुन्य माझे
शुन्यात शुन्य बघणे जमते तुला कसे गं?
पहिल्याच कटक्षाने घायाळ जाहलो मी
तडफड बघून हसणे जमते तुला कसे गं?
म्हणतात प्रेम वाहे सरिते समान वेगे
थोपून भाव धरणे जमते तुल कसे गं?
बालिश म्हणून मजला परिपक्व भाव दावी
वेळे अधीच पिकणे जमते तुला कसे गं?
तुज ठेच लागता मी कण्हलोय आर्ततेने
मम वेदना विसर्स्णे जमते तुला कसे गं?
यात्रेत शेवटीच्या डोळे हजार ओले
लपऊन नेत्र पुसणे जमते तुला कसे गं?
झाडावरील घरटे होते जरूर अपुले
सोडून त्यास उडणे जमते तुला कसे गं?
श्रीमंत हात धरला "निशिकांत" पूस तिजला
हर्रास होत विकणे जमते तुला कसे गं?
निशिकांत देशपांडे म्प.नं. 98907 99023
E MAIL: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
क्या बात है...
केले वजा तुला जर आयुष्य शुन्य माझे
शुन्यात शुन्य बघणे जमते तुला कसे गं?
वाह, क्या बात है निशिकांतजी, सुंदरच...
अभिप्राय
झाडावरील घरते आपले जरूर होते ही ओळ खूप भावली.
ही पाखरे इथे पण जमतात ती कशाला
असतेउडायचे गगनी भुलतात ती कशाला
ही त्यावर मला सुचलेली ऑळ आहे.
कशी आहे.
प्रकाश क्षीरसागर
अभिप्राय
झाडावरील घरते आपले जरूर होते ही ओळ खूप भावली.
ही पाखरे इथे पण जमतात ती कशाला
असतेउडायचे गगनी भुलतात ती कशाला
ही त्यावर मला सुचलेली ऑळ आहे.
कशी आहे.
प्रकाश क्षीरसागर
अभिप्राय
झाडावरील घरते आपले जरूर होते ही ओळ खूप भावली.
ही पाखरे इथे पण जमतात ती कशाला
असतेउडायचे गगनी भुलतात ती कशाला
ही त्यावर मला सुचलेली ऑळ आहे.
कशी आहे.
प्रकाश क्षीरसागर
बहोत्
"यात्रेत शेवटीच्या डोळे हजार ओले
लपऊन नेत्र पुसणे जमते तुला कसे गं?"
वाह...!वा....!
हा हासीलेगझल शेर.....!
तुमचे शेर वाचून मलाही एक शेर आठवला...
माफी चाहतो पण....!
लिहतोय,
"जखमाच काळजाच्या रक्ताळल्या कशा ह्या ?
पाठीत घाव करणे जमते तुला कसे गं?
-------पुष्कर राउत-----------