गजला मधुनी

हसणे हसतो रडणे रडतो गजला मधुनी
ओघळणारे अश्रू पुसतो गजला मधुनी
सारे माझे मी सा-यांचा मान्य जरी मज
माझ्या पासुन मीच हरवतो गजला मधुनी
माझे गाणे वा रडगाणे माझे आहे
मूकपणाने मी गुणगुणतो गजला मधुनी
दार जरी मज बंद जगाचे, देवा घरच्या
उंबरठ्यावर मी घुटमळतो गजला मधुनी
मान्य मला आंधार पसरला चार दिशांना
यत्न कवडसा होण्या करतो गजला मधुनी
ओंगळवाण्या श्रीमंतीची हाव कशाला?
गरिबीसंगे लिलया जुडतो गजला मधुनी
चंदन होउन जगती जे जे दुस-यासाठी
गंध तयांचा मी पसरवतो गजला मधुनी
काळोखी जे नेते करिती काळे धंदे
ढोल नगारे मीच बडवतो गजला मधुनी
गजला फुलल्या गजला हसल्या "निशिकान्ताच्या"
स्वर्ग सुखाने मी गुदमरतो गजला मधुनी
निशिकान्त देशपांडे मो.नं. 98907 99023
E Mail nishides1944@yahoo.com
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
चंदन होउन
चंदन होउन जगती जे जे दुस-यासाठी
गंध तयांचा मी पसरवतो गजला मधुनी
क्या बात है निशिकांतजी, सुंदरच...
MeiZiTang Botanical Slimming Soft Gel MZT
Experts pointed out that meizitang botanical slimming soft gel , for an hour of meizitang diet pills the energy consumption about 500 cards meizitang slimming soft gel you can walk, you can develop meizitang botanical slimming according to their physical meizitang condition of a progressive agenda, if we wish to meizitang soft gel can see the effect.
चंदन होउन जगती जे जे दुस-यासाठी...
चंदन होउन जगती जे जे दुस-यासाठी
गंध तयांचा मी पसरवतो गजला मधुनी
क्या बात है निशिकांतजी, सुंदरच...
आत्मानंद -
माझे गाणे वा रडगाणे माझे आहे
मूकपणाने मी गुणगुणतो गजला मधुनी .....
गझलातून मूकपणाने इतके छान गुणगुणत आहात, आत्मानंद तो आणखी वेगळा काय असतो!