हात दे हातात....

बहर's picture

हात दे हातात आता
चालुया ही वाट आता

त्याच स्वप्नांची नव्याने
घालुया रुजवात आता!

संपवू कोठे कथा?
कोठे करू सुरवात आता?

ही मिठी सोडू नको..
सरली जरी बरसात आता!

मोगरा कोमेजला पण..
दरवळे श्वासांत आता!

वाट मी पाहू किती?
थांबू किती दिनरात आता?

का स्मृती उजळीत बसणे..
राहिले हातात आता?

ते धुके.. अन तो किनारा
मिसळले दर्यात आता!

- बहर.

Vidyanand Hadke's picture

सुंदरच रचना आहे....

वाह वा बहोत अच्छे,
सुंदरच रचना आहे....
पण आपण खुप लाजरे आहात असे दिसते, कधी तुमचा चेहराही दिसू द्या आम्हाला....

बहर's picture

धन्यवाद...

हडकेजी.. प्रतिसादबद्दल धन्यवाद. आणि हो.. मी लाजरा नाहीये..हाहा.. पण इथे 30 केबी चीच फाईल अपलोड होते.. आणि तशी कुठली इमेज अत्ता माझ्याकडे नाहिये. तुम्ही मला ऑर्कुट वर संपर्क करू शकता. babumoshaaay नावाने शोध करा. म्हणजे चेहरा देखील दिसेल. माझा मो.क्र. 9029268212 आहे. ह्यावर सुद्धा संपर्क करू शकता.

पुन्हा आभार.