तुझ्या वहीमध्ये....

तुशार देसले's picture

तुझ्या वहीमध्ये,माझे मोरपीस
आणि माझे श्वास,सोबतीला

तुझ्या वहीमध्ये,गुलाबाचे फुल
बांधणार पुल,संवादाचा

तुझ्या वहीमध्ये,मीच पानोपानी
अजिंठ्याची लेणी,कोरलेली

तुझ्या वहीमध्ये,नि:शब्दाचं गाणं
माझी ओळखुन,मोरपंखी

हसुन घातली,जेव्हा मला साद
तेव्हाच प्रसाद,वाटला तो
-तुशार देसले
9028143231