मुक्त आकाश...

कमलाकर देसले's picture

गरज बरस रे पावसा रोखुन सगळा श्वास
कळ्ले ना तुज सांग कसे भिजते ना आकाश

क्रोधाने रवी बोलला भस्म करीन अवकाश
तो तर जळतो आजही जळले ना आकाश

धुळ बोलली करीन मी चारित्र्याचा र्‍हास
धुळ धुळीला मिळली पण मिळले ना आकाश

वारा गर्वाने म्हणे मोडीन मीच मिजास
घडी जरा ना मोडली जैसे थे आकाश

कसले सार्‍यांनी पुन्हा आरोपाचे पाश
र्‍ह्दयी सर्वांच्या जरी जैसे थे आकाश
-कमलाकर देसले
9421507434