कैफ त्या डोळ्यातला..

कैफ त्या डोळ्यांतला पाहून जो तो चूर होता..
रंगलेल्या मैफिलीचा आगळा तो नूर होता!
त्या कटाक्षाने नशा चढली असावी वेगळी ही...
तो रिता पेला खरेतर ठेवला मी दूर होता!!
पाहिले सांगून खर्जातून जेव्हा सत्य ते मी
ऐकणाऱ्यांचा टिपेला पोचलेला सूर होता!
ती कथा नाहीच झाली सांगुनी सगळी कधीही..
सांगणाऱ्याच्याच डोळ्यातून आला पूर होता!
दाद ना येते.. अता ना वाहवा होते जुनी ती..
ऐकणारा मैफिलीपासून झाला दूर होता!!
-- बहर.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
"आले ना
"आले ना कोणते राग माझ्या मैफलीस,
एकटया भैरवीचा संपलेला सूर होता...............!"
MeiZiTang Botanical Slimming Soft Gel MZT
Experts pointed out that meizitang botanical slimming soft gel , for an hour of meizitang diet pills the energy consumption about 500 cards meizitang slimming soft gel you can walk, you can develop meizitang botanical slimming according to their physical meizitang condition of a progressive agenda, if we wish to meizitang soft gel can see the effect.
डोळ्यात-------
त्या कटाक्षाने नशा चढली असावी वेगळी ही...
तो रिता पेला खरेतर ठेवला मी दूर होता!!
वा वा वा. किती वॅळेस वा वा लिहू? सर्वच शेर अप्रतीम.. भावानांच्या अत्त्युच्य शिखरावर गेलात आणी मलाही पोहंचवलेत. पुढील मार्गक्रमणासाठी लाख शुभेछा'