सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या!

सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या..
चला, केव्हांतरी आयुष्यही जवळून पाहू या!!
दिव्या, पंख्याविना वातानुकूलीत हे असे जगणे..
चला अंधार पाहू या, जरा निथळून पाहू या!!
किती उपकार मानावे, अता ह्या भार नियमांचे?
अता ह्या शासनालाही जरा 'खवळून' पाहू या!!
समुद्राच्या जणू लाटा, तसे हे मानवी जत्थे..
चला प्रस्थापितांचे जग जरा उलथून पाहू या!!
दिव्याची वात ही साधी, तिला सांगून मी दमलो!
म्हणे!..ह्या वादळालाही जरा बिलगून पाहू या!!
-- बहर.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
वाह वा क्या बात है...
दिव्याची वात ही साधी, तिला सांगून मी दमलो!
म्हणे!..ह्या वादळालाही जरा बिलगून पाहू या!!
वाह वा क्या बात है, बहोत खुब !!!
धन्यवाद...
विद्यानंदजी.. धन्यवाद.. आपण आवर्जून प्रतिसाद देता. आभारी आहे.