अर्थ

काळीज माझे चितेविणा जेव्हा जळाया लागले!
खर्या प्रितीचे अर्थ तेव्हा मला कळाया लागले!
दैवत काळजाचे तुला मानुनी केली मी पुजा
हेच ते पुण्य जे पाप बनुनी छळाया लागले!
मी पावसात इतरांची घरे बांधत राहिलो,
भर उन्हात घरटे तरी माझे गळाया लागले!
जाचातुनी जात्याच्या माझी अजुन सुटका नाही
पहा,वेडी माणसे माझी राख दळाया लागले!
जाणूनी प्रितीत पडूनी झालोय मी आता "वेडा"
यारही जवळचे माझे दूर पळाया लागले!
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
अन्तरिचे
अन्तरिचे बोल गजलेतुन व्यक्त केलेस मित्रा.....!
जाणूनी प्रितीत पडूनी झालोय मी आता वेडा
यारही जवळचे माझे दूर पळाया लागले!........वस्तुस्थिति आहे.......!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
प्रिय अमोल,
इतक्या उशिरा प्रतिसाद देतोय त्याबद्दल माफ कर. कामात व्यस्त असल्याने वेळच मिळाला नाही.
असो..तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद....