तू चुकावे, अन सदा समजून घ्यावे मी!!

तू चुकावे अन सदा समजून घ्यावे मी!!
हे गनीमांचेच "कावे" का बघावे मी?
पोचुनी क्षितीजावरी का थांबणे झाले?
उमटलेल्या पावलांना का बघावे मी?
बंद दारे, आणि खिडक्या, अन कवाडे ही...
तूच दे ना वाट, कुठुनी आत यावे मी?
रातराणीच्या कळीला, रात्र का येण्या हवी?
प्रश्न आहे मोगऱ्याचा, (का फुलावे मी? )
पेच आहे चालण्या, वा थांबण्याचा हा...
वाट आता सांग, का ना पांघरावी मी?!!
-- बहर.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
वाह्
वाह् वा....... !!!!!!!!!!!
धन्यवाद
कदमसाहेब.. धन्यवाद.