माय मराठी बोलत राहू...

Vidyanand Hadke's picture

एक नवा प्रयोग म्हणून ही गझल आपणा सर्व दिग्गजां समोर सादर करण्याच धाडस करत आहे,
निश्चितच आपण सर्व जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्षित आहेच...

रखकर दिलपर पथ्थर संकट झेलत राहू
जगण्याची मग रीत जगाला सांगत राहू

अश्क यहा पी पीकर आम्ही चढतो डोंगर
त्याच बळावर आयुष्याशी झुंजत राहू

याद सुहानी लेकर आपण फुलवू हे मन
वादळवारा पाऊसधारा सोसत राहू

प्यार नही है दिलबर हे ना सांगायाचे
ये प्रेमाचे रोप नव्याने फुलवत राहू

घायल दिलपर मरहम करण्या नसते कोणी
ह्रदयावरचे वार सुखाने भोगत राहू

ताने तो वो देंगे त्यांना देऊ दे तू
हसत मुखाने आपण दोघे भेटत राहू

हिंदी सबको प्यारी का मग झाली ओझे
हिंदी सोबत माय मराठी बोलत राहू

निशिकान्त्'s picture

प्रतिसाद

गजलेची भट्टी मस्त जमली आहे. हिन्दी मिश्रित मराठी गजला प्रचलनात आहेत. गजलकार डा.शेख इक्बाल मिन्ने यांच्या एका गजल संग्रहात अशा गजला वाचल्या आहेत. प्रयोग करत करत आगे बढो. माझ्या सदिछा आहेतच.

संजय बोरुडे's picture

प्रयोगबाबत.

चांगला प्रयत्न आहे.गझलेची नवी जमीन शोधण्यासाठी प्रयोग व्हायला पाहिजेत.