जबाब

संजय बोरुडे's picture

इतकाच जिन्दगीचा माझा हिसाब होता
उरला अखेर हाती खोटा नकाब होता..

फुलता वसंत येथे हैराण बाग झाली
बहरात रोपट्याला काळा गुलाब होता..

नव्हताच शाप त्यांना केव्हाच गंजण्याचा
पण हाय रे जमाना त्यांचा खराब होता..

सुटला नमाज जेव्हा चालू जकात झाली
समवेत याचकांच्या शाही नबाब होता..

भलताच काळ्जाला केला सवाल होता
भलताच काळ्जाचा आला जबाब होता..!!

Vidyanand Hadke's picture

शुभेच्छा ! ! !

फुलता वसंत येथे हैराण बाग झाली
बहरात रोपट्याला काळा गुलाब होता..

क्या बात है, शुभेच्छा!!!

संजय बोरुडे's picture

दाद्

धन्यवाद,विद्याधरजी....!
फार बसता येत नाही.गुगलवर माझा ब्लोग आहे.सवडीने बघून सान्गा.

निशिकान्त्'s picture

प्रतिसाद

गजल खूपच छान जमली आहे. पण एक सुचना कराविशी वाटते. मराठी गजलेत शक्यतो मराठी शब्दच वपरण्याचा प्रयत्न असावा काही शायराना वाटते उर्दू शब्द पेरल्याने गजलेस गजलपण प्राप्त होते. हा काही नियम नव्हे. आपल्या पहिल्या शेरात जिंदगी ऍवजी जीवन शब्द मात्रेत राहून वापरता आला असता
अनाहूत सल्ल्या बद्दल क्षमस्व

संजय बोरुडे's picture

प्रतिसादबद्दल.

प्रतिसादबद्दल धन्यवाद.
पण चर्चा प्रत्यक्ष झाल्यास बोलता येईल.
रिवायती अन पारम्परिक गझल लिहून कोणती सन्पन्नता एणार आहे्?
प्रश्न आहे तो नव्या वाटा धुन्डाळण्याचा.नवे कवाफी,प्रयोग करण्याचा.उर्दु,हिन्दी शब्द वापरु नये अस काही नियम नाही.आशय ,गझलियत अन अभिव्यक्ती महत्त्वाची.माझा सम्पर्क क्रमा्न्क _9372560518

निशिकान्त्'s picture

आपला प्रतिसाद दि. 05.09

धन्यवाद. मी ज्यांच्या कडून मार्गदर्शन घेतले त्यांचा कटाक्ष होता की शक्य तो मराठी शब्द वापरावे. मी एका गजलेत "सावन" हा शब्द वापरला होता तो बदलून त्यानी "श्रावण" असा करावयास लावला. मी येथे त्यांचे नाव देत नाही पण त्याचीही कांही भूमिका असावी असे मी समजतो. आपल्याला माक्ष्या टिपणी मागील पार्श्वभूमी कळावी म्हणून हा सारा प्रपंच!
आपला ई मेल पत्ता मिळाल्यास ठीक होईल. आपला अमुल्य वेळ घेतल्या बद्दल क्षमस्व.11

सचिन म्हैसकर's picture

बढिया...

बढिया...

संजय बोरुडे's picture

दाद्

धन्यवाद.

esjayan's picture

Ben Roethlisberger Jersey