एकरुप

कागदे माझी वाच जराशी!
लपेटून घेशील उराशी!
चमचमता बंगला दिसे
पण मी प्रामाणिक घराशी!
शाप तुझे ते मनापासुनी
तुलना त्यांची दैवी वराशी!
जेथे जुळती मने मनाला
कर जुळती तेथे कराशी!
घेती भरारी गगनावरी
अंती पाखरे येती धराशी!
माझ्या गात्री तू परमेश्वर
एकरुप तू चराचराशी!
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
सचिनच्या गझलेबाबत.
सचिन,
कागदे माझी असे अनेकवचन खटकते.
धन्यवाद
आदरणीय संजय दादा,
मुळात जे काही मी लिहीतो आहे ती गझल नाहीच.परंतू आपल्यासारख्यां वरिष्ठांचे आशिर्वाद व मार्गदर्शन लाभावे या हेतूनेच इथे प्रकाशित केल्या आहेत. मी वर्धेला राहतो व इथे गझलेकरिता मार्गदर्शन मिळणे कठिण आहे. करिता आपल्या मदतीची अपेक्षा आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आपला,
सचिन म्हैसकर
9766697321