माझी ही रचना गझल होवु शकते का ?

रुपेन्द्र कदम's picture

वाटेवरती मना लागली एक खन्त आहे
अनन्त जन्मे असा भोग हा आदि ना अंत आहे.

माझ्या दारावरती नक्षी काळाने कोरलेली
तो म्हणतो मीच द्वैत अन मीच सन्त आहे.

मी जोगी बैरागी आहे असा कित्येक जन्मान्चा
तो कमरेवर हात ठेवूनी उभा अनन्त आहे.

निशिकान्त्'s picture

गजल

आपली रचना वाचली. गजल लिहाविशी वाटते यातच अर्धी लढाई जिन्कली. आपली रचना गजल होण्यास अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल.
आपण दीर्घ मात्रेस गा म्हटले व लघू मात्रेस ल म्हटले तर पहिल्या शेराच्या दोन ओळीच्या मात्रानंचा हिशोब खलील प्रमाणे असेल:
गा गा गा गा ल गा गा ल गा गा ल गा ल गा गा
ल गा गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
आपणास लक्षात येईल की मात्रा ज्या गजलेचा प्राण असतात त्या जुळत नाहीत म्हणून आपली रचना गजलेत मोडत नाही
पण आपल्या मधे गजलकार आहे हे प्रकर्षाने जाणवते. कोणी गजल लिहिणार ही बाबच मला प्रोत्साहित करते म्हणूनच हे लिहिण्याचे धाडस केले. योग्य की अयोग्य हे माहित नाही.. आपण पुण्यात वास्तव्यास आहात का?