रचल्या तुझ्याच साठी

ह्रदयी अनेक लाटा उठल्या तुझ्याच साठी
गजला अनेक सखये रचल्या तुझ्याच साठी
चाहूल लागता तव दरी वसन्त फुलतो
केसातल्या कळ्याही फुलल्या तुझ्याच साठी
आनन्द दावण्याची अपुलीच रीत असते
वेली लता खुशीने झुलल्या तिझ्याच साठी
स्वप्नात कैद तुजला करण्यास रामप्रहरी
ग्लानीत पापण्याही मिटल्या तुझ्याच सार्ही
बघताच दु:ख माझे होतील क्लेश तुजला
जाणून वेदना मम हसल्या तुझ्याच साठी
दिसताच तू कुणाची लागेल द्ष्ट म्हणुनी
पणत्या घरातल्या बघ विझल्या तुझ्याच साठी
केला जगी दिखावा मी धैर्यवान आहे
तिमिरात पापण्या ह्या भिजल्या तुझ्याच साठी
श्रध्दा नसून आता मी मन्दिरात जातो
देवास आणा भाका दिधल्या तुझ्याच साठी
आधी कधीच नव्हतो मी चोर या जगीचा
पण काल चान्दण्या मी लुटल्या तुझ्याच साठी
"निशिकान्त" भेटण्या तुज तीही अधीर दिसते
ओठात हास्य रेषा फुलल्या तुझ्याच सातठी
निशिकान्त देशपान्डे मो.न. 98907 99023
e mail nishides1944@yahoo
प्रतिसादाची प्रतिक्षा
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
Leo
testking icnd |
testking ccip |
testking BCP-420 |
testking BCP-421 |
testking 156-215-70 |
testking 156-215-71 |
स्द्फ्स्द्फ्