कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
वेदनांचा बांध ओसंडून गेला
ही कशी आहे जिवाची तल्खलीशी
मेघ माथ्यावर जरा थांबून, गेला
आस का जीवा असे अजुनी जगाची
मांडला जो डाव तो, मोडून गेला
तो पुन्हा येणार नाही, जाणले मी
आठवांशी गाठ जो बांधून गेला
देउनी सारे तुला आता रिता मी
कोण हा काही पुन्हा मागून गेला?
वाटले का मी तुझ्या शोधात होतो?
का असा भाग्या मला चुकवून गेला?
भोवती आनंद कोंदाटून आता
स्पर्श त्याचा अंतरी होऊन गेला
प्रतिसाद
डाव तो मोडून गेला....
ही कशी आहे जिवाची तल्खलीशी
मेघ माथ्यावर जरा थांबून, गेला
आस का जीवा असे अजुनी जगाची
मांडला जो डाव तो, मोडून गेला
अप्रतीम...
फार आवडले....
शुभेच्छा , असेच लिहीत रहावे..
व्वा
व्वा छान आहे गझल.
हुंदका साधा तुझा सांगून गेला
वेदनांचा बांध ओसंडून गेला
ही कशी आहे जिवाची तल्खलीशी
मेघ माथ्यावर जरा थांबून, गेला
वाटले का मी तुझ्या शोधात होतो?
का असा भाग्या मला चुकवून गेला?
हे शेर छानच आहेत.
सतीश आवडली
सतीश
आवडली गजल. तल्खली, आठवांशी गाठ, रिता, मक्ता आवडले. वाटले का... कल्पना खरच आवडली.
लिहीत रहा. शुभेच्छा!
बरी आहे.
सतीशराव्, थोडी घाई झाली.
कल्पना तासल्या नाहीत पूर्णपणे!
आस का जीवा असे अजुनी जगाची...
वाटले का मी तुझ्या शोधात होतो?...
...अशा सुरुवातींना सानी मिसरा तितकासा जोमदार आला नाही.
तो पुन्हा येणार नाही, जाणले मी
आठवांशी गाठ जो बांधून गेला
देउनी सारे तुला आता रिता मी
कोण हा काही पुन्हा मागून गेला?
हे ठीक.
माझे - ४.५/१०.
नव्याने प्रयत्न करून पहा ना!
रिता मी
देउनी सारे तुला आता रिता मी
कोण हा काही पुन्हा मागून गेला?
हा शेर आवडला.बाकी विसूनानांशी सहमत.
- कुमार
विसुनाना, हे पाहा.
-विसुनाना, हा प्रयत्न कसा वाटतो आहे?
आस का जीवा असे अजुनी जगाची
जो म्हणावा आपला, टाळून गेला
वाटले का मी तुझ्या शोधात होतो?
नकळ्ता का तू मला हरवून गेला?
-सतीश
जमलेत!
वाटले का मी तुझ्या शोधात होतो?
माफ कर, पत्ताच गं हरवून गेला...
कसे वाटेल?
वाटले का...
-विसुनाना,
मला अभिप्रेत असलेला अर्थ मी पुढे मांडतो आहे.
"मी एक deserving candidate, असं मला खात्रीनं माहित आहे. त्या अर्थी भाग्य माझं देणेकरी आहे आणि माझं देणं तर त्यानं दिलेलं नाही. म्हणून माझ्या पासून तोंड चुकवणं त्याला करावं लागतंय. पण त्याच्या त्या देण्याशी मला खरं तर घेणं नाहीच. म्हणूनच मी त्याच्या शोधात नाहीये, हे मला त्याला सांगायचं आहे, इतकंच"
मी कुणा 'तिच्या' शोधात लिहिलेला शेर नाही तो. तुम्ही लिहिलेली ओळ हा त्याचा वेगळाच दृष्टीकोन झाला. :)
-सतीश
छान!
पहिले २ शेर विशेष आवडले!
-- पुलस्ति.
बांध...
वेदनांचा बांध आवडला.
-आभाळ :)
थॅंक्स मित्रांनो,
-आनंद, दाद, सुधीर, विसुनाना, कुमार, पुलस्ति,
अभिप्रायांबद्दल मनापासून धन्यवाद.
विसुनाना, कुमार, तुम्ही म्हटल्याप्रमाणे पुन्हा प्रयत्न अवश्य करेन.
आभाळ, मी पोस्ट करत असतानाच तुमचा अभिप्राय येत होता, धन्यवाद.
-सतीश
बरी आहे गजल
सतीश अज्ञानाबद्दल क्षमस्व. पण तल्खली म्हणजे काय?
तल्खली
-याचा अर्थ असह्य असा उष्मा. पण त्यातल्या असहायतेनं होणारा मानसिक त्रासही मला अभिप्रेत आहे.
-सतीश
सतीशजी
सुटे सुटे मिसरे मस्त आले आहेत. उदा :- जिवाची तल्खली , तो पुन्हा येणार नाही वगैरे. पण एकूणच आणखी थोडं काम व्हायला हवं होतं . चू. भू. दे. घे.