कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हुंदका साधा तुझा सांगून गेला
आसवांना नाद तो देऊन गेला
पुरूष जातीचा असा इतिहास आहे
राम सीतेला वनी सोडून गेला
सारखा तू पाहतो माझ्याकडे का?
आरशाचा प्रश्न भंडावून गेला
झाडली सारी मनाची जळमटे,पण
एक कोळी हा कसा राहून गेला?
काय आता पाखराने या करावे?
पारध्यावर जीव जर मोहून गेला
मोहमाया नेहमी दारात येती
आज संयम रेष ओलांडून गेला
प्रतिसाद
छानय्
प्रमोद
आवडल्या कल्पना आणि त्यांची शब्दात बांधणीही.
आसवांना नाद, आरशाचा प्रश्न, पारध्यावर जीव, मक्ता - खूप खूप आवडले. त्यातही पारध्यावर जीव आणि मक्ता लाजवाब आहे.
सुंदर लिहिता!
--शलाका
'स' का नसतो?
मी आतापर्यंत काही गझला पाहिल्या ज्यात 'स' गायब आहे.
सारखा तू पाहतो माझ्याकडे का?
आरशाचा प्रश्न भंडावून गेला
इथे पाहतोस माझ्याकडे.. असे असायला पाहिजे ना?की माझेच मराठी कच्चे आहे?
प्रमोदराव,हाच शेर -
सारखा तू पाहशी माझ्याकडे का?
आरशाचा प्रश्न भंडावून गेला
किंवा -
सारखा तो पाहतो माझ्याकडे का?
आरशाला प्रश्न भंडावून गेला
असा लिहिता आला असता.
बाकी निवांत बोलू.
सहमत
" स" येणे गरजेचे आहे . बाकी गझल आणि कल्पना आवडल्या. कोळीचा शेर मस्त
सारखा तू
सारखा तू पाहतो माझ्याकडे का?
आरशाचा प्रश्न भंडावून गेला
वा...
काय आता पाखराने या करावे?
पारध्यावर जीव जर मोहून गेला
हा ही आवडला...
वा!!
प्रमोद,
सुंदर आहे गझल!!! २ ते ५ शेर आवडले. मतल्यातल्या दोन मिसर्यांमधला परस्पर संबंध (मला) थोडा धुसर वाटला. मतल्याच्या सानी मिसर्यात 'हुंदका काय सांगून गेला?' ह्याचे उत्तर मिळायला हवे असे वाटते. अर्थात हे माझे मत. :-) चू.भू.दे.घे.
पु.ले.शु.
- नचिकेत आठवले
छान गझल .. :)
सारखा तू पाहतो माझ्याकडे का?
आरशाचा प्रश्न भंडावून गेला
काय आता पाखराने या करावे?
पारध्यावर जीव जर मोहून गेला
हे सगळ्यात जास्त आवडले :)
--आपले आभाळ :)
विसूनानांना अनुनोदन
काय आता.. व्वा!
पुरूषा जातीचा.. अणि झाडली सारी.. याचं प्रयोजन कळलं नाही किंवा पटलं नाही.
रेष च्या ठिकाणी वेस?
चू भू द्या घ्या
रेष बरोबर
मेघधारा ती "लक्ष्मणरेषा" आहे. मोहमाया + रेष = सीताहरण.
छान जमल्ये
प्रमोद
छान आहे गझल. आरसा आणि पारधी फारच छान.
सुधीर
छान!
शेवटचे २ शेर खूप आवडले!
आरसा - विसुनानांशी सहमत.
मतला - नचिकेतशी सहमत. हुंदका "आसवांना नाद देऊन गेला" हा स्वतंत्र मिसरा छानच आहे. पण तो "काय सांगून गेला" ते स्पष्ट करीत नाही.
कोळी - मी जळ्मटे काढत बसलोय, पण या सार्या जळ्मटांचे जे मूळ कारण आहे (कुठले?) ते मात्र या उठाठेवीत तसेच शिल्लक आहे.. असा काहिसा मला अर्थ लागतोय. पण नीट उलगडत नाहिये..
राम शेर - सुटसुटीत आहे. लय आहे. स्पष्ट आहे. पण मला रुचला नाही... अर्थात हा माझ्या व्यक्तिगत आवडीनावडीचा भाग झाला :)
शुभेच्छा!!
-- पुलस्ति.
आभार्
काय आवडले वा नावडले हे इतक्या आत्मियतेने लिहिल्या बद्द्ल आभार. आसवांना (नसलेला) नाद देण्यासाठी मी आलोय असं हुंद्का म्हणतोय असं मला म्हणायचं होतं.राम सीता असे संदर्भ आल्यामुळे पहिल्या शेराला उगाचच धार्मिक रंग आलाय की काय असा मला संशय येतोय.अर्थात पुरुषांनी स्त्रियांवर अनेक वेळा अनेक प्रकारे अन्याय केलेत या विचाराला ही कुणाचा आक्षेप असेल तर माझा नाइलाज आहे.एखाद्या शेराचं स्पष्टीकरण करायला लागणं हा त्या शेराचा(त्या रसिका समोर तरी)पराभवच .तो मला मान्य आहे.
प्रमोदजी..
माझी नावड जरी व्यक्तिगत असली तरी तर्काधारीत आहे. रामाचे उदा. generalize करणे योग्य नाही. जर रामाचेच उदा. घेऊन कोणी म्हणाले की बघा अलम पुरुषजात किती आदर्श पुत्र, वचनप्रिय, पराक्रमी, सच्चा मित्र इ.इ. असते. तर ते हास्यास्पदच ठरेल की नाही? जे सद्गुणांचे तेच दोषांचेही असे मला वाटते. "पुरुषोत्तमा" चे उदा. अखिल पुरुष जातीला लावणे हे, काव्यात असले तरी, तर्कसंगत नाही. अर्थात पुन्हा हे माझे हे वैयक्तिक मत आहे -:)
दोन शेर छान!
-प्रमोद,
चांगली आहे गझल.
हे दोन शेर त्यातही विशेष आवडले.
झाडली सारी मनाची जळमटे,पण
एक कोळी हा कसा राहून गेला?
काय आता पाखराने या करावे?
पारध्यावर जीव जर मोहून गेला
-सतीश
चांगली आहे.
झाडली सारी मनाची जळमटे,पण
एक कोळी हा कसा राहून गेला? (Best)
मोहमाया नेहमी दारात येती
आज संयम रेष ओलांडून गेला
तांत्रिक बाब सोडली तर-
सारखा तू पाहतो माझ्याकडे का?
आरशाचा प्रश्न भंडावून गेला
हे तिन्ही शेर आवडले.
पुरूष जातीचा असा इतिहास आहे
राम सीतेला वनी सोडून गेला
नसता तर बरे असे वाटले.
गझल हझल इतकी मस्त झाली नाही.
माझे - ६/१०.
वा!
सारखा तू पाहतो माझ्याकडे का?
आरशाचा प्रश्न भंडावून गेला
झाडली सारी मनाची जळमटे,पण
एक कोळी हा कसा राहून गेला?
काय आता पाखराने या करावे?
पारध्यावर जीव जर मोहून गेला
गझल आवडली.
वा!
प्रमोदजी,
गझल आवडली.
आज संयम रेष ओलांडून गेला - वा!
मक्ता अप्रतिम आहे.
कोळी, पारधीही - कल्पना सुंदर आहेत.
- कुमार
छान
मतला इतका जमला नाही असे वाटले. बाकी सर्व शेर आवडले.
कोळी, मोहमायेची वेस सुंदर!
सुंदर कल्पना
काय आता पाखराने या करावे?
पारध्यावर जीव जर मोहून गेला ...मस्तच!!
मोहमाया नेहमी दारात येती
आज संयम रेष ओलांडून गेला ... छान जमलाय..
कोळी ची कल्पना छान आहे..