कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..

हुंदका
हुंदका साधा तुझा सांगून गेला
नाव त्याचे, घाव जो घालून गेला
हुंदका साधा तुझा सांगून गेला
शब्द का ओठातला गोठून गेला
"वादळाची साद होती देखणीशी"
बोलला का गाव ,जो वाहून गेला!
माणसांना जाग येऊ दे जराशी....
(ऐकले मी ,सूर्य अंधारून गेला)
श्वास आहे, जीवनाचा भास माझ्या
वाहता होता,कुठे आटून गेला?
मीच केले हासण्याचे ढोंग येथे
हुंदका साधा तुला सांगून गेला...
आठवांनो सोडली ती वेस मागे.....
गंध गावी त्या कसा राहून गेला!
चांदण्यांचा देश माझा एकट्याचा
चांद वेडा गीत हे गुंफून गेला
-
प्रतिसाद
छान जमली
छान जमली आहे.
>>शब्द का ओठातला गोठून गेला
हे ज्याम आवडलं!
छान!
शब्द का ओठातला गोठून गेला!
हे आवडलं!
चांगली आहे.
काही सूचना :
१. "वादळाची साद होती देखणीशी"
-'देखणीशी' ऐवजी दुसरे विशेषण वापरता येईल का? (उदा. ' आर्जवाची')
२.(ऐकले मी ,सूर्य अंधारून गेला)
-'अंधारून' ऐवजी 'ही झोपून' बरे वाटेल का? (वरच्या ओळीत 'जाग' आहे.)
३. हुंदका साधा तुला सांगून गेला...('हासण्याचे ढोंग' नंतर..)
-ऐवजी 'दाबलेला हुंदका फसवून गेला' कसे वाटेल?('ढोंग'~'फसवणे')
४.आठवांनो सोडली ती वेस मागे.....
-'आठवानो'जागी 'आठवांनी'?
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सूचना उपयोगी वाटल्या तर उत्तमच. नाहीतर त्यांना कचर्याची टोपली दाखवावी.
गझलेस माझे - ६/१०.
आभार्
झाड, विसूनाना, आभाळ
प्रोत्साहनाकरता आभारी आहे.
शंकांची उत्तरे: साद देखणी कशी असेल असा प्रश्न स्वाभाविक आहे, ही ऐकायची आहे पहावयाची नाही. पण ह्या देखणीमधून मोह टाळण्यास अवघड असे सुचवायचे आहे. भुरळ पाडणारी अशा वेगळ्या अर्थाने मी तो शब्द वापरला आहे
सूर्य उगवला की माणसे सर्वसाधारणपणे आपल्या दिवसाची सुरुवात करतात. माणूसकी नष्ट झाली आहे त्यामुळे अशा झोपलेल्या माणसांना सूर्य उगवल्याने सुद्धा काय फरक पडणार, त्यांची माणुसकी परत येणार नाही या विचाराने सूर्यच ओशाळला आहे, खिन्न आहे, जणु उगवला तरी अंधारला आहे, प्रकाशित करण्यास असमर्थ आहे असे सुचवायचे आहे.
आपला विचार वेगळा आहे. त्यावर विचार करायला हवा.
हुंदका तुला मध्ये हा हुंदका तिचा नसून कवीचा आहे, त्याने जे लपवण्याचा प्रयत्न केला तेच तिला हुंदका सांगून गेला. (आणखी वेगळे फसवणे कशाला हवे? असे मला वाटत आहे. )
आठवांनो मध्ये आठवणींना विचारलेला हा प्रश्न आहे. आठवणीनो, तुम्ही गावाची वेस ओलांडली/ किंवा मी तुमच्याबरोबर गाव सोडले असा अर्थ अपेक्षित आहे.
हे शब्द विचाराअंती वापरले होते, त्यांचे अर्थ पोहोचू शकले नसतील तर ती जबाबदारी माझी .
६/१० ह्म्म , सुधारणेस बरीच जागा दिसते आहे. सूचनांना कचर्याची टोपली दाखवलेली नाही, ध्यानमंदीरात थोडी जागा दिली आहे...
धन्यवाद.
'भुरळ पाडणारी साद'
सूचनांची दखल घेतल्याबद्दल आभार.
६/१० म्हणजे हम्म नाही. -चांगली!
मी जरा कंजूस आहे इतकेच!:)
अ. वादळाची भुरळ पाडणारी साद 'गारुडाची' असू शकते का?
ब. 'तुला' - मला समजले होते. माझा अर्थ - हसण्याचे ढोंग मी तुझ्यापुढे कितीही केले, तरी
माझा हुंदका मात्र मलाच फसवून - निसटून गेला.
क. आठवांनो, - ' , ' स्पष्ट!
छान्
हुंदका फसवून गेला समजले.
मला शेर बदलावा असे वाटत नाही. आपली कल्पना छान आहे . विसूनाना, आपल्या प्रतिसादाने आनंद झाला. आठवांनो पटले.
मी च मधला च नको, टाळता आला असता असे वाटायला लागले आहे. त्यापेक्षा वेगळी वाक्यरचना योग्य झाली असती ; एकाने सुचवणी दिली आहे त्याप्रमाणे.
कुणाचे चित्तरंजन कसे करावे आपल्याला छान जमते. ह्म्म म्हणजे चांगली हे कळून फार फार बरे वाटले.( गावाला वादळाची साद देखणी वाटली, हे रूपक आहे ते तुम्हाला सांगायला नकोच् )
गारुडाची - गारुड्याची नव्हे
'गारुडाची' - 'जादूची','संमोहित करणारी', 'भारून टाकणारी' या अर्थाने. ('गारुड्याची' नाही हे स्पष्ट झाले असेलच.)
मीच केले हासण्याचे ढोंग येथे
हुंदका साधा तुला सांगून गेला...
ऐवजी-
हासण्याचे ढोंग मी केले कितीही
हुंदका माझा - मला फसवून गेला
पण यात तुला,तू वगैरे... येत नाही. चालत असल्यास पहा बुवा.
हे चित्तरंजन इ.इ. नाही. चांगले शेर आणखी चांगले व्हावेत हीच इच्छा.
मी जास्त त्रास देत असेन आणि सहवाचकांचे प्रतिसाद झकोळून टाकत असेन तर शतश: क्षमस्व! इतर मित्रांचीही क्षमा मागतो. या गझलेवर आता इतकेच.
बघायला हवे
क्षमा कशाला हो. गारूडा म्हणजेच गारूडी असे वाटले. शेर चांगले होण्यासाठी तुमच्या प्रतिसादाची मदत होईल. धन्यवाद्
सुंदर झालीये...
झाडाशी सहमत...'शब्द गोठणे' मलाही आवडले.
पुढच्या लेखण प्रवासास शुभेच्छा :)
शब्द का ओठातला गोठून गेला
हुंदका साधा तुझा सांगून गेला
शब्द का ओठातला गोठून गेला
आवडले.
२
२ शेरांमध्ये अलामत भंगली आहे...
"चांद वेडा गीत हे गुंफून गेला"
"शब्द का ओठातला गोठून गेला" - पण हाच मिसरा खूप आवडला :-)
चु.भूद्या.घ्या.
पण सुंदर आहे गझल...
शुभेच्छा..
नाही चुकली
'ऊ' अलामत आहे.
छान शेर
-रसिक,
माणसांना जाग येऊ दे जराशी....
(ऐकले मी ,सूर्य अंधारून गेला)
हा शेर छान आला आहे.
सतीश
अभिनंदन
रसिक, कार्यशाळेतल्या गझलेमधे तुझ्या गझलेला पहिला नंबर मिळाला प्रकाशित व्हायला.......अभिनंदन :)
गझल सुरेख झालीये .
हुंदका साधा तुझा सांगून गेला
शब्द का ओठातला गोठून गेला
हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
हो... खरंच
हो... खरंच की.. अलामत "ऊ" आहे...
क्षमस्व!
धन्यवाद विसूनाना..
छान!!
२ रा व ४था शेर विशेष आवडले.
पु. ले. शु.
- नचिकेत आठवले
सुंदर कल्पना
रसिकपंत,
सुंदर कल्पना...
शब्द का ओठातला गोठून गेला हा मिसरा विशेष आवडला. 'शब्द या ओठांतला' हा छोटासा बदल दोन ओळींत अधिक संबंध प्रस्थापित करेल असं वाटलं.
असेच थोडे बदल करायला वाव आहे असं वाटलं.
- कुमार
रसिक
माणसांना.. हा शेर खुपच छान.
मक्ता मला कळला नाही. वाचल्यावर दोन्ही ओळींत मला काही कनेक्टीविटी जाणवली नाही. प्रयोजन कळले नाही.
मीच केले हासण्याचे ढोंग येथे.. इथे असं काही होतय का बघ..
हासण्याचे ढोंग केले मी जरासे..
म्हणजे मीच टाळता आला तर..
मक्ता
हासण्याचे ढोंग हा बदल चांगला वाटतोय.
मक्ता- हा शेराचा रूपक म्हणून एक अर्थ निघेल .
दुसरा अर्थ असा की "ह्या सर्व चांदण्यांचा देश त्याचा एकट्याचा आहे असे म्हणून चंद्र एक गीत गुंफून गेला."
इथे त्याला म्हणूनच वेडा म्हटले आहे. चांदवेडा की वेडा चांद हे वाचकावर सोडून दिले तर आणखी एक अर्थ निघेल.
प्रतिसादासाठी आभारी आहे.
छान आहे पण..
माणसांना जाग येऊ दे जराशी....
(ऐकले मी ,सूर्य अंधारून गेला)
श्वास आहे, जीवनाचा भास माझ्या
वाहता होता,कुठे आटून गेला?
हे दोनही शेर आवडले. हुंदका साधा तुझा.. ही ओळ पुन्हा वापरणे रुचले नाही. वादळाची साद होती देखणीशी.., ही ओळ सुंदर पण सानी मिसरा पटला नाही. शब्द ओठातला फार फार आवडले.
शुभेछ्छा.
- चिन्नु
धन्यवाद्
चिन्नु,
एका गझलेत दोन मतले असू शकतात आणि त्या दोन मतल्यांमध्ये पहिली ओळ तीच नसावी असा नियम ऐकलेला नाही. ह्याविषयी माहिती मिळेल का? पहिली ओळ वेगळी घेऊनही लिहिता आले असते मुद्दाम तसे केले नाही.
आपली आवड निवड वेगळी असू शकते, तसे वेळोवेळी सांगत जावे, एक वेगळे मत कळते.
धन्यवाद्
बरोबर आहे
प्रत्येकाची आवड वेगळी. मतले चांगले आलेत, पण हुंदका तुझा साधा, हे तुम्ही नंतरच्या शेरामध्ये पण वापल्यामुळे तसे म्हटले मी.
नियम आहेत की नाहीत ते मला माहीत नाही. जे वाटले तेव्हढे सांगावेसे वाटले इतकचं.
चिन्नु
वा पहिली गझल प्रकाशित झाली का ? अभिनंदन
"वादळाची साद होती देखणीशी"
बोलला का गाव ,जो वाहून गेला!
आठवांनो सोडली ती वेस मागे.....
गंध गावी त्या कसा राहून गेला!
हे शेर आवडले..
छान!
मतला, सूर्य, आणि वेस हे शेर खूप आवडले!!
-- पुलस्ति.
वाह !
मस्त जमलीये रे मित्रा !
गोठून.... जबरीच !
बोलला का गाव... आवडला रे !
श्वास... सही उतरलाय हा !
आठवानी... वेस... आह !
छानच जमलिये रे मित्रा !
जया ला अनुमोदन पहिला क्रमान्क मिळाल्यावबद्दल अभिनन्दन !
श्वास, मक्ता, वादळाची साद
श्वास, मक्ता आणि वादळाची साद खूप आवडले. गझलेत बरेच हुंदके आले आहेत, असे दिसते :-)
- परीवश
धन्यवाद्
सर्वांचे आभार!
गंध गावी
रसिकजी
गंध गावी त्या कसा राहून गेला .. मस्त आहे. छान शेर आहेत